Friendship At Workplace : आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करतात. महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. घर, कुटुंब सांभाळत महिला यशस्वीपणे नोकरी किंवा व्यवसायसुद्धा करतात. महिलांच्या सर्वांगिणदृष्ट्या विकासाचा विचार केला तर ही खूप चांगली बाब आहे. तुम्ही जर कुठे नोकरी करत असाल तर तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का की, तुमच्या ऑफिसमधील महिलांचे अनेक लोकांबरोबर घनिष्ठ संबंध असतात. अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षण केंद्रानुसार, महिला आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांचे अनेकांबरोबर खूप चांगले संबंध असतात. अनेक महिला कामावर किंवा जोडीदाराच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा घनिष्ठ मैत्री जोपासताना दिसतात.

घर, कुटुंब, जबाबदारी आणि नोकरी सांभाळताना महिलांना व्यक्त व्हायला वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकदा त्या त्यांच्या संवादातून कामाच्या ठिकाणी मैत्री निर्माण करतात. जरी आज महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असली तरी अनेक उद्योग क्षेत्र असो किंवा कामाच्या ठिकाणी पुरुषांचे वर्चस्व जास्त दिसून येते; त्यामुळे थोड्या प्रमाणात का असो, महिलांना संघर्ष करावा लागतो. अशावेळी जवळची सहकारी मदत करत असेल तर महिलांना मदत होते.
हे जवळचे लोक नवनवीन संकल्पना सुचवू शकतात. महिलांना काम करण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा मिळू शकते, तसेच ते नवीन काम करण्यास महिलांना प्रोत्साहन देऊ शकतात. संशोधनाचा विचार केला तर स्त्रिया दीर्घकाळपर्यंत ऑफिसमध्ये सर्वांशी मिळून मिसळून राहतात. ऑफिसच्या पलीकडे त्या एक वेगळे जग निर्माण करतात.

हेही वाचा : Mangalsutra : लग्नानंतर मंगळसूत्र नाहीच घातलं तर…? स्त्रीधन महत्त्वाचं, पण नेहमी का घालायचं?

कामाच्या ठिकाणी घनिष्ठ मैत्री योग्य आहे का?

कामाच्या ठिकाणी घनिष्ठ मैत्री असेल तर आव्हाने कमी येतात आणि एकमेकांना समजून घेण्यास मदत होते. काही लोक या घनिष्ठ संबंधांना अव्यावसायिक समजतात, कारण त्यांच्या मते, यामुळे कामावर लक्ष केंद्रित होत नाही आणि ऑफिसमध्ये असे लोक एकमेकांचे गॉसिप करतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी घनिष्ठ मैत्री योग्य आहे का? असा प्रश्न विचारला जातो. खरं तर कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने मैत्री जोपासू शकतो. मुळात त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की, आपल्या मैत्रीचा ऑफिसच्या कामावर आणि ऑफिसच्या इतर सहकाऱ्यांवर याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे.

कामाच्या ठिकाणी घनिष्ठ मैत्रीचे फायदे

  • अनेकदा कामाच्या ओघात आपण एकाच ठिकाणी तासन् तास बसतो अशावेळी जर जवळची सहकारी असेल तर आपण कामातून ब्रेक घेऊ शकतो.
  • सहकारी जर चांगला मित्र किंवा मैत्रीण असेल तर टीममध्ये एकता दिसून येते,
  • कामाचा स्ट्रेस कमी होतो.