आता सगळीकडेच मस्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडीमध्ये प्रतिकारशक्ती थोडी कमी झाल्यानं सर्दी खोकला होणं अगदी सामान्य आहे. पण घरातल्या स्त्रियांना मात्र आजारी पडून चालत नाही. स्त्री आजारी पडली की सगळं घर आजारी होतं असं म्हणतात. त्यामुळे तुमची तब्येत चांगली ठेवायची असेल तर आम्ही तुम्हाला काही मस्त हेल्दी ड्रिंक्स सांगणार आहोत. स्वयंपाकघरात असणाऱ्या घटक पदार्थांपासूनच ही ड्रिंक्स करता येतात. तेव्हा थंडी एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला आतून उब देणारी काही ड्रिंक्स नक्की ट्राय करा…

मसाला चहा
थंडी म्हणजे गरमागरम चहा हवाच. चहाप्रेमींसाठी तर थंडी अगदी पर्वणीच असते. थंडीच्या सीझनमध्ये कितीही वेळा चहा प्यायला तरी मन भरत नाही. थंडीत तुम्ही तुमच्या नेहमीच्या चहाबरोबरच मसाला चहाही ट्राय करु शकता. लवंग, दालचिनी, आलं, जायफळ, तुळशीची पानं असे सगळे औषधी घटक एकत्र करून त्या मसाल्यापासून तयार केलेला हा अस्सल देशी चहा या थंडीत पिऊन पाहाच. या मसाल्यामुळे शरीर आतून गरम राहतं आणि थंडी बाधत नाही.

Can lemon Juice Reduce Motion Sickness
गाडीच्या प्रवासात मळमळ, उलटी होत असेल तर लिंबू जवळ ठेवाच! डॉक्टरांनी सांगितले फायदे, लिंबू खाऊ नका उलट असा वापरा
Malai coconut water
भरपूर मलईयुक्त नारळ कसा निवडावा? जाणून घ्या कसे ओळखावे…
alcohol on zomato swiggy
झोमॅटो-स्विगीवरून खरंच दारू मागवता येणार का?
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
Healthy Midnight Snacks Option
रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या
How to save people who are swept away by floods
लोणावळ्यासारखी दुर्घटना तुमच्याबरोबर घडली तर काय कराल? पुरात अडकल्यास फक्त ‘ही’ एक कृती मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढेल, पाहा VIDEO
How Japan is set to make millions of vending machines obsolete
पैसे टाकल्यावर वस्तू देणाऱ्या मशीन्स जपानमध्ये चर्चेत का आल्या आहेत?
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : शीघ्रपतन कसं टाळाल?

आल्याचा काढा
थंडीमध्ये आलं खाणं अतिशय चांगलं. आपल्यापैकी अनेकांच्या घरात आजी किंवा आई आलेपाक, आल्याच्या वड्या करत असतीलच. पण आल्याचा काढाही थंडीमध्ये अगदी उत्तम आहे. एका पातेल्यात पाणी घाला, त्यात आल्याचा एक तुकडा घालून भरपूर उकळा. पाणी उकळून निम्मं झालं की ते ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात मध घालून प्या. या काढ्याने शरीर आतून उष्ण राहतं.

आयुर्वेदिक काढा
आपल्या आजीच्या बटव्यातला हा काढा म्हणजे थंडीमधल्या सर्दीवरचा अगदी रामबाण उपाय. वेलदोडा, दालचिनी, आलं, काळे मिरे, गवती चहा, आणि तुळशीची पाने भरपूर पाण्यात उकळा. त्यानंतर चहासारखंच गाळून गरमागरम प्या. थंडीत हा काढा नियमित घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

ग्रीन टी
डाएट करणाऱ्यांना, वजन कमी करणाऱ्यांना ग्रीन टीबद्दल वेगळं सांगायला नको. पण थंडीमध्ये घशाला ऊब देण्यासाठी गरमागरम ग्रीन टी चा एक कप अगदी आवश्यकच आहे. घसा खवखवत असेल तर मग ग्रीन टी प्यायलाच हवा. थंडीमध्ये चहाचं प्रमाण साहजिकच वाढतं. पण ग्रीन टीमुळे ते आटोक्यात राहतं.

आणखी वाचा : वेश्याव्यवसायात ढकललं… समाजानं झिडकारलं… पण आज कर्तृत्व पाहून सन्मानित केलं!

गरम लिंबू पाणी
उन्हाळ्यात लिंबू पाण्यानं थंडावा मिळतो. तर थंडीमध्ये गरम पाण्यात लिंबू सरबत घेतलंत तर सी व्हिटॅमिन भरपूर मिळतं. त्यामध्ये तुम्ही थोडंसं मध घालून घेतलंत तर आणखीनच फायदा होतो.

हळदीचे दूध
हळद ही रोगप्रतिकारक आहे आणि हळदीचे दूध तर आपल्याकडे अनेक आजारांवरचा रामबाण उपाय मानला जातो. घसा खवखवणे, सर्दी, थकवा यावर हळदीचे दूध अत्यंत गुणकारी आहे. हळदीच्या दुधात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीव्हायरल गुण असतात. त्यामुळे शरीर निरोगी राहतं. थंडीमध्ये रोज रात्री झोपायच्या आधी तुम्ही हळदीचं दूध पिऊ शकता.

बदामाचे दूध
बदाम शरीरासाठी उत्तम आहेत. ते रोगप्रतिकारक आणि स्टॅमिनासाठी चांगले मानले जातात. बदामाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे तुम्हाला ताकद आणि एनर्जी मिळते. बदामाच्या दुधामुळे प्रतिकार शक्तीही वाढते.

आणखी वाचा : महिलांसाठीची सुपरफूडस्

दालचिनीचा काढा
दालचिनी रोगप्रतिकारक आहे. डाएटमध्येही दालचिनीचं महत्त्व आहे. दालचिनी अत्यंत औषधी आहे. थंडीच्या दिवसांत दालचिनी पावडर गरम पाण्यात घालून तो काढा घेतल्यास सर्दी, खोकला, अंगदुखी दूर होते.

टोमॅटो सूप
थंडीच्या दिवसांत गरमागरम सूप पिण्याची मजा काही औरच ! थंडीत टोमॅटो सूप पिणं अत्यंत गुणकारी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे थंडीत तुम्ही जर रोज टोमॅटो सूप प्यायलात तर प्रतिकारशक्ती वाढते. आता वाढत्या थंडीत तुमच्या जेवणामध्ये गरमागरम टोमॅटो सूपचा समावेश नक्की करा.

भाज्यांचे सूप
हिवाळ्यात भाज्या भरपूर आणि छान मिळतात. मटार, गाजर, पालक अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून किंवा त्यांची कॉम्बिनेशन्स करून तुम्ही हेल्दी सूप्स करू शकता. या हेल्दी सूप्समुळे तुमच्या जेवणाची लज्जत आणखीनच वाढेल यात शंका नाही.

आणखी वाचा : पोटच्या मुलीची हत्या करताना, तिने काय केला असेल विचार?

रस्सम
रस्सम पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. गरमागरम रस्सममुळे तुमची थंडी पटकन पळून जाते. काळे मिऱ्यांसह पारंपरिक मसाले घालून रस्सम मसाला तयार केला जातो. रस्समचे बरेच प्रकार आहेत. पण चिंच, कडीपत्ता, आलं, मोहरी, हिंग घालून भाज्यांसह बनवलेलं रस्सम एक पूर्णान्न तर आहेच पण औषधीही आहे. रस्सममध्ये असलेल्या मसाल्यामुळे शरीर आतून गरम आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते. घसा खवखवणे, फ्लू, सर्दी आणि खोकल्यावरही रस्सम अत्यंत गुणकारी आहे. या थंडीत एखाद्या रात्रीच्या जेवणाचा बेत गरमागरम भात आणि रस्सम असा नक्की करून बघा.

काश्मिरी कहावा
ग्रीन टी, दालचिनी,वेलदोडे आणि केशर घातलेल्या काश्मिरी कहावा फक्त काश्मीरच्याच नाही तर आपल्याकडच्या थंडीतही गुणकारी आहे. खूप जास्त थंडी पडत असेल तर सकाळी सकाळी हा कहावा नक्की पिऊन बघा.

(शब्दांकन : केतकी जोशी)