वनिता पाटील

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : या सोबतच्या छायाचित्रामधल्या मुलीकडे जरा नीट बघा…
ती कुठूनही अजिबातच वेडी वाटत नाही.
पण मग सगळ्या जगाने पप्पू ठरवलेल्या माणसाचा हात धरून अशी वेड्यासारखी हसत हसत का निघालीये ती?
तिचं आणि त्याचं नातं काय आहे?

gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
diy skin care prevent foot odour this summer expert tips on how to keep your feet fresh all day
उन्हाळ्यात घामामुळे पायांना दुर्गंधी येतेय? मग फॉलो करा डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?
How To Grow Mogra in Small Pot Money Saving Hack
२ रुपयांच्या खडूने मोगऱ्याचं रोप कळ्यांनी गच्च भरून जाईल; लहान कुंडीत फुलबाग सजवण्याचा उपाय, पाहा Video

हातात फुलं घेऊन, दुसऱ्या हातात एका मुलीचा हात घेऊन, गालावरच्या खळ्या मिरवत कुठं निघाला आहे तो?
तिला भीती वाटत नाही अजिबातच असा कुणाचा तरी हात धरून भर रस्त्यातून चालत जायची?
याला कापा, त्याला मारा, त्याला झोडा,
हिंदूंनो मुस्लिमांपासून सावध रहा, तुमचा धर्म त्यांनी धोक्यात आणलाय,
हिजाब घेणाऱ्या त्यांच्या मुलीबाळींना रस्त्यात अडवा, त्यांचा हिजाब ओरबाडून काढा
हिंदू स्त्रियांनो संस्कृती पाळा, चार चार मुलं जन्माला घाला
दलितांनो आवाक्यात रहा
अशा सगळ्या हिंसक वातावरणात कुठल्या स्त्रीला कुठे वाटत असतं सुरक्षित?

सगळ्या बाजूंनी संस्कृती रक्षणाची जबाबदारी जणू तिच्या नाजूक खांद्यावरच येऊन ठेपलेली असते.
उठलीस तर उठलीस का, बसलीस तर बसलीस का, घरकोंबडी होऊ नकोस, नोकरीसाठी घराबाहेर पडू नकोस…
सतत ऐकून घेत असते ती. तिला सतत शिकवलं जातं पुरूषाला घाबरून रहायला. त्याचा स्पर्शच काय, सावलीदेखील अंगावर पडू द्यायची नसते तिने घरच्यांच्या परवानगीशिवाय.
असं असताना असं दिवसाढवळ्या, चारचौघांसमोर त्याच्या हातात हात देऊन इतकी बिनधास्त, इतकी आनंदात कशी जाऊ शकते ती?

नेमकं काय वाटत असेल तिला त्या क्षणी?
तिला असेल का कल्पना, तिचं हे छायाचित्रं दुसऱ्या क्षणी जगभर झळकणार आहे याची?
कोण लागतो तो तिचा?
मित्र? प्रियकर? भाऊ? सखा?
कुणीच नाही?
खरंच कुणीच नाही…

विखाराने भरलेला भारत प्रेमाने जोडू या असं म्हणत घराबाहेर पडलेला एक निवळशंख माणूस तिला भेटला आहे…
म्हणून कदाचित आनंदाने हसते आहे ती.
तिलाही नको आहे कुठलाच रक्तपात, दंगे-धोपे.
द्वेष, विखार, मत्सर, असूया
त्यात तिचं काय काय होरपळून जातं ते तिला माहीत आहे. तिच्या आई-आजी-पणजीकडून
तिला तिच्यासाठी, तिच्या भावंडांसाठी, मुला-नातवंडांसाठी हसतं खेळतं जग हवं आहे.

तिला कुणालाही कापायचं नाहीये आणि कुणालाही झोडायचं नाहीये.
जगण्याच्या वाटेवर आनंदाने जीवनगाणं गात जावं एवढंच तिचं भाबडं स्वप्न आहे.
असं वाटावं एवढीच ती वेडी आहे.
आणि याच भावनेने तिच्या हातात हात मिळवून दोन पावलं चालणारा आणखी एक वेडा तिला भेटला आहे.
म्हणून ती आनंदाने हसते आहे…
वेडीच आहे ती!