-डॉ. किशोर अतनूरकर

एक स्त्री रुग्ण माझ्याकडे आली. सहजपणे विचारलं, ‘बोला, काय त्रास होतोय?’ ती म्हणाली, ‘‘डॉक्टर मला ना, लो बीपीचा त्रास आहे, तुम्ही सलाइन लावा, मला बरं वाटेल.’’ काय त्रास होतोय हे न सांगता तिने थेट स्वतःच्या आजाराचं निदानच नाही तर उपचार काय करायचा हेदेखील सुचवलं. मी लगेच तिचं बीपी तपासलं, ते नॉर्मल होतं. तिला अर्थातच सलाइनची गरज नव्हती.

What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?
Spiritual guru and founder of the Isha Foundation, Sadhguru Jaggi Vasudev, has undergone emergency brain surgery
मोठी बातमी! अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेंदू शस्त्रक्रिया

अशी समस्या घेऊन स्त्रिया अधूनमधून सर्वच डॉक्टरांकडे येत असतात. काही स्त्रिया आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात तर हा समज कायमचा होऊन बसलाय. असा समज असलेल्या स्त्रीचा नवरादेखील डॉक्टरांशी बोलत असताना सहज म्हणून जातो, ‘हिला तसं काही झालेलं नाही, फक्त लो बीपीचा त्रास आहे, सलाइन लावलं की कमी होतो.’ दोन बायका बोलत असतानादेखील ‘मला लो बीपीचा त्रास आहे, परवाच डॉक्टरकडे जाऊन सलाइन लाऊन घेतलं, तेव्हापासून जरा बरं वाटतंय’ अशी चर्चा करताना ऐकलंय.

‘लो बीपी’ या शब्दाचा खरा अर्थ समजावून घेऊ. लो म्हणजे कमी आणि बीपी म्हणजे ब्लडप्रेशर किंवा रक्तदाब. एखाद्या रुग्णाचा रक्तदाब कमी झालेला असल्यास त्याचं बीपी लो झालेलं आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं योग्य असतं ते फक्त गंभीर रुग्णांच्या बाबतीत. एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे, रुग्ण शॉकमध्ये आहे तर त्या रुग्णाचं बीपी लो असू शकतं. अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून तातडीचे उपचार करावे लागतात. व्यवस्थित चालणाऱ्या, फिरणाऱ्या, नियमित जेवण करणाऱ्या व्यक्तीस लो बीपीचा त्रास असून, सलाइनची गरज आहे, असं होऊ शकत नाही.

आणखी वाचा-कोण आहे भक्ती मोदी? इशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलमध्ये काय आहे तिची जबाबदारी?

काही कारणांमुळे एखाद्या स्त्रीला अशक्तपणा जाणवत असल्यास, तिला असं वाटतं की, सलाइन लावल्यानंतर आपल्याला ताकद येईल म्हणून ती डॉक्टरकडे जाते आणि ‘मला सलाइन लावा डॉक्टर’, अशी मागणी करते. गमतीदार गोष्ट म्हणजे काही डॉक्टर्स तसं करतातही. म्हणूनच सलाइन लावण्याने शक्ती येते हा गैरसमज दूर झाला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब किती आहे, या प्रश्नाचं उत्तर एकशे वीस-ऐंशी किंवा एकशे सत्तर-शंभर असं दिलं जातं. कागदावर लिहीत असताना ते १२०/८० किंवा १७०/१०० या पद्धतीनं लिहिलं जातं. रुग्णाचं बीपी नॉर्मल आहे की वाढलंय किंवा कमी (लो) झालंय हे सांगत असताना वरचं बीपी आणि खालचं बीपी अशी डॉक्टरांना शब्दयोजना करावी लागते.

वास्तविक पाहता वरच्या अंकास Systolic BP, खालच्या अंकास Diastolic BP असं म्हणतात. दोन व्यक्तीचं बीपी तंतोतंत सारखंच असतं असं नाही, किंबहुना ते वेगवेगळंच असतं, पण ‘नॉर्मल’ च्या कक्षेत (range) मध्ये असल्यास काळजीचं कारण नाही. एखाद्या व्यक्तीचं ९०/७० हे बीपी त्या व्यक्तीसाठी नॉर्मल असू शकतं. बीपी ९०/७० आहे म्हणजे लो बीपी आहे आणि त्याला सलाइनची आवश्यकता आहे असं नाही. लो बीपी म्हणजे नेमकं काय, हे रुग्णाला फारसं माहिती नसतं आणि अनेक डॉक्टरदेखील त्यांचा हा चुकीचा समज दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाहीत.

आणखी वाचा-नातेसंबंध: तुमची बॉस ‘लोनर’ आहे का?

“मला लो बीपीचा त्रास आहे, मला ‘विकनेस’ आहे, मला सलाइन लावा,’ अशी समस्या घेऊन बऱ्याचदा स्त्रियाच येतात, पुरुष नाही. यातील अनेक स्त्रियांचं शरीर नव्हे, तर मन थकलेलं असतं. सलाइन लावल्याने, आपल्याला ‘शक्ती मिळाली’ याचं समाधान त्यांना मिळतं आणि त्यांना खरंच बरं वाटतं. पण ते शारीरिक नव्हे तर मानसिक असतं. मला लो बीपीचा त्रास आहे, त्यामुळे अशक्तपणा आहे, त्यासाठी मला शक्तीच्या इंजेक्शनची किंवा ग्लुकोज-सलाइन लावण्याची गरज आहे, या रुग्णाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. डॉक्टरांनीदेखील या रुग्णाच्या मनात निर्माण झालेल्या गैरसमजला खतपाणी घालू नये.

(लेखक एम.डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काऊन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.

atnurkarkishore@gmail.com