उपान्त्यपूर्व फेरीत शुक्रवारी ऑस्ट्रेलियाशी भिडण्यासाठी सज्ज होणाऱ्या पाकिस्तानी संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानला दुखापतीमुळे विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे.
७ फूट १ इंच उंचीच्या इरफानने पाच सामन्यांत ५ बळी मिळवले आहेत. परंतु दुखापतीमुळे तो आर्यलडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. पाकिस्तानी संघाचे फिजिओथेरपिस्ट ब्रॅड जॉन्सन यांनी इरफानची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर त्याच्या दुखापतीचे गांभीर्य स्पष्ट केले. या दुखापतीमुळे तो विश्वचषक स्पध्रेतील पुढील सामने खेळू शकणार नाही, असे जॉन्सन यांनी सांगितले.