(विचारमग्न अवस्थेत चंपक येतो.)
तोताराम : चंपकशेठ, अहो किती उशीर?
चंपक : ट्रॅफिक फार. पकायला झालं. पण पर्याय कुठाय. दिलशानने सेंच्युरी मारली, तुम्ही सांगितलं होतं. आणि संगकाराला खरंच बांगलादेशची बॅटिंग आवडते.
तोताराम : हे कामच आमचं.
चंपक : आज कस लागणार आहे विठ्ठलपंतांचा.wc13
(विठ्ठलपंत एक काळं आणि एक पिवळं कार्ड देतात.)
तोताराम : वेस्ट इंडिजविरुद्ध दक्षिण आफ्रिका जिंकेल. पण त्यांना खेळात आमूलाग्र बदल करावा लागेल. महिनाभरापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिजला सहज नमवलं होतं. अगदी तस्सेच खेळावे लागेल. वेस्ट इंडिज ‘बहती हवा का झोका’ आहेत आणि आफ्रिका नाकासमोरून चालणारी माणसं आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये इमोशन्स डोईजड होऊ न देणारा संघ जिंकेल. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड म्हणजे एकही क्षण चुकवू नये अशी मॅच. एकदम पॅशनेटली खेळतात दोन्ही संघ. दोन्ही संघ फॉर्मात आहेत, दोघांकडेही भरपूर ऑलराउंडर्स आहेत, दोन्ही यजमानच आहेत, मात्र ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. न्यूझीलंडवाले कांगारूंविरुद्ध एक्स्ट्रा जोशाने खेळतात, पण एका विवक्षित क्षणी ते शरणागती पत्करतात. मॅच त्यांच्या घरी आहे, चाहते त्यांच्या सोबतीला आहेत. ‘एक पाऊल पुढे’ धोरण स्वीकारलं तर ते ऑस्ट्रेलियाला भारी पडू शकतात. केन विल्यमसनला हिरो व्हायची संधी आहे. ऑस्ट्रेलियाच्या अकराही जणांना आठ तास राबावं लागेल.
चंपक : साउंड्स स्पाइसी. नक्की पाहतो लवकर उठून..