इंधनाची चणचण आणि हवेत फैलावले जाणारे प्रदूषण या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणून पुढे आलेल्या इलेक्ट्रिक कारला (बॅटरीवर चालणाऱ्या) जगभरात वाढती मिळेल आणि २०२० पर्यंत जागतिक विक्रीत १० टक्के हिस्सा ती कमावेल, असा विश्वास ‘रेनॉ’चे मुख्याधिकारी कार्लोस ट्रॅव्हरेस यांनी पॅरीसमध्ये सोमवारी प्रस्तुत केलेल्या ‘झोये’ या आपल्या नव्या कारद्वारे व्यक्त केला. फ्रान्स सरकारची आंशिक मालकी असलेल्या ‘रेनॉ’ची ही नवीन कार युरोपमध्ये दाटलेले आर्थिक मंदीचे मळभ दूर सारणारे पाऊल ठरेल असेही मानले जात आहे. यामुळेच फ्रेंच सरकारचे प्रोत्साहन व अनुदान ‘झोये’ला प्राप्त झाले असून, परिणामी किंमतीच्या बाबतीत तिने किफायतशीरताही साधली आहे.