niyojanनको असलेल्या जीवन विमा योजनांची खरेदी तर व्यावसायिक नुकसानभरपाईपासून संरक्षण देणाऱ्या योजनेची वानवा ही आपल्याकडे व्यावसायिकांमध्ये आढळणारी सर्रास प्रवृत्तीच..
अनेक वैद्यक व्यावसायिकांच्या गुंतवणुका पाहताना जो समान दोष आढळतो तो म्हणजे वित्तीय ध्येय निश्चित न करता गुंतवणूक केल्याने कामचुकार गुंतवणुकांचे प्रमाण वाढत जाते. मोठय़ा संख्येने नको असलेल्या जीवन विमा योजनांची खरेदी तर व्यावसायिक नुकसानभरपाईपासून संरक्षण देणाऱ्या योजनेची (ढ१ऋी२२्रल्लं’ कल्लीिेल्ल्र३८ ढ’्रू८) वानवा हे नमुनेदाखल उदाहरण देता येईल. अनेक वैद्यक व्यावसायिक ‘लोकसत्ता अर्थ वृत्तांत’चे वाचक आहेत. यापकी प्रत्येकाने आपली व्यावसायिक जोखमीचा विचार करून त्याचे नियोजन करणे जरुरीचे आहे. आज एका पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका युवतीचे तिच्या वैद्यकीय व्यवसायासह आगामी आर्थिक नियोजन जाणून घेऊ.
डॉ. श्रुती मंगेश नाडकर्णी (३०) या बधिरीकरण (अल्ली२३ँी२्र’ॠ८) या विद्याशाखेत एमडी करीत आहेत. त्यांचे वडील महाराष्ट्र शासनाचे निवृत्त कर्मचारी आहेत व आई गृहिणी आहेत. वडिलांची बदलीची नोकरी असल्याने त्यांचे शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांनी शालान्त परीक्षा रायगड जिल्ह्य़ातील पनवेल येथून दिली. त्यांनी अहमदनगर जिल्ह्य़ातील एका विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. या शिक्षणासाठी त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले होते. या कर्जाचा मोठा हिस्सा त्यांच्या वडिलांनी निवृत्तीपश्चात मिळालेल्या पशातून फेडला. त्या आईवडिलांच्या एकुलत्या एक आहेत. सध्या त्यांच्या आईवडिलांचे वास्तव्य ठाणे शहरात आहे. डॉ. श्रुती यांनी वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर एक वर्ष एक खासगी नìसग होममध्ये काम केले. या काळात त्यांना ४० हजार रुपयांचे वेतन मिळत होते. या एका वर्षांत जे वेतन मिळत होते. त्या वेतनातून त्यांनी स्वत:चा खर्च भागवून पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या खर्चाची तजवीज केली. ऑगस्ट २०१३ पासून त्यांना मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या काळात त्यांना ५० हजारांचे विद्यावेतन मिळते. स्वत:चा खर्च (मेस, धोबी, वैयक्तिक वापराच्या वस्तू) अभ्यासाची पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च मिळून दरमहा १२ हजार खर्च होतात. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात प्रत्येकी १८ महिन्यांची दोन शैक्षणिक सत्रे असतात. या तीन वर्षांत दोनदा प्रत्येकी ५६ हजार शैक्षणिक शुल्क भरावे लागते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे जून २०१६ पासून त्यांना एक वर्षांची सरकारी नोकरी करणे सक्तीचे आहे. त्यांना पदव्युत्तर पदवी मिळण्यास अजून दोन वष्रे लागतील. त्यांच्या उत्पन्नाला खऱ्या अर्थाने त्यांच्या वयाच्या तेहतीसाव्या वर्षी सुरुवात होईल. बधिरीकरण या विषयात एमडीची पदवी घेतल्यानंतर एकाद्या शहरात किंवा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी स्वतंत्र व्यवसायास करणे किंवा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी यांपकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यांचे प्राधान्य नोकरीला असून ते न जमल्यास त्या बहुधा खासगी व्यवसाय करण्याचा मार्ग स्वीकारतील.

जीवन विमा    
डॉ. श्रुती सध्या महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात राहतात. सध्याच्या त्यांच्या अंदाजपत्रकानुसार ४० हजार वेतनापकी १२ हजार खर्चून २८ हजार शिल्लक राहतात. डॉ. श्रुती कमवायला लागल्यापासून पुढील २६  वष्रे कामवित्या राहणार आहेत. त्या आईवडिलांच्या एकुलत्या एक असणे व त्यांच्यासमोर असलेले उज्ज्वल भविष्य पाहता त्यांच्या नियोजनाची सुरुवात मुदतीचा विम्याने (टर्म इन्श्युरन्स) करणे इष्ट ठरते. या काळात त्यांच्या जबाबदाऱ्याही वाढत जातील म्हणून शक्य तितक्या लगेचच त्यांनी एक ते सव्वा कोटीचा ३० वष्रे मुदतीचा विमा खरेदी करावा. पूर्णवेळ नोकरी अथवा व्यवसाय सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी आपले त्यांच्या विम्याचे छत्र पाच कोटींपर्यंत वाढवत न्यायचे आहे. त्यांचे उत्पन्न जसे वाढत जाईल तसे त्यांची विमा पात्रता वाढत जाईल. आजच्या घटकेला त्यांना दीड कोटीपेक्षा जास्त विमा मिळू शकणार नाही. डॉ. श्रुती यांचे काम प्रत्यक्ष रोग्यांशी संबंधित (क्लिनिकल) असते व रुग्णालयात दूषित वातावरण असते. याचा परिणाम रुग्णालयातील प्रत्येकाच्या आरोग्यावर होत असतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते असे शिकाऊ विविध रोगांना बळी पडतात. डेंग्यू किंवा क्षयासारख्या रोगाने शिकऊ डॉक्टर बळी गेल्याची ताजी उदाहरणे आहेतच. यातील एखाद्या रोगाची (उदारणार्थ क्षय) बाधा झाल्यास विमा मिळत नाही किंवा विमा हप्त्यांत वाढ होते. म्हणून डॉ. श्रुती यांनी शक्यतो सुदृढ व निरोगी असताना ही पॉलिसी खरेदी करावी.
व्यावसायिक जोखमीचे नियोजन   
दुसरा महत्त्वाचा मुद्दा डॉ. श्रुती या बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करीत असताना त्या काही व्यावसायिक जोखमीला सामोऱ्या जाणार आहेत. एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला भूल दिल्यापासून तो पुन्हा शुद्धीवर येईपर्यंत बधिरीकरण तज्ज्ञाची जबाबदारी असते. रुग्ण दगावणे अथवा रुग्णास कायमची इजा होणे, हा वैद्यक व्यवसायातील धोका आहे. व्यायसायिक हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचे नातेवाईक नुकसान भरपाईचा दावा करू शकतात. अशा संभाव्य नुकसान भरपाईपासून संरक्षण देणारी (ढ१ऋी२२्रल्लं’ कल्लीिेल्ल्र३८ ढ’्रू८) विमा पॉलिसी प्रत्येक वैद्यक व्यावसायिकाप्रमाणे डॉ श्रुती यांनीही खरेदी करणे जरुरीचे आहे.
आरोग्य विमा
डॉ. श्रुती वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत असल्याने व त्यातही बधिरीकरण तज्ज्ञ असल्याने त्यांना एखाद्या शस्त्रक्रियेसाठीचा येणाऱ्या खर्चाची चांगलीच कल्पना आहे. आज एखादे आजारपण किंवा अपघातामुळे रुग्णालयात भरती व्हायची वेळ आलीच तर किमान ७५ ते ८० हजारांचा खर्च होतो. डॉ. श्रुती यांच्यावर कुटुंबात दोन ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी आहे. अशा कुटुंबाला आरोग्य विम्याची आवश्यकता नक्कीच आहे. म्हणून त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची पाच लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या विमा छत्राचे संरक्षण देणारी पॉलिसी घ्यावी. विवाहपश्चात पतीचे व अपत्यप्राप्तीनंतर अपत्याचे नाव या पॉलिसीत जोडावे.
बचतीचे नियोजन
डॉ. श्रुती यांना मिळणाऱ्या विद्या वेतनातून त्या काही बचत करू इच्छितात. त्या पूर्वी त्यांच्या वित्तीय ध्येयांची निश्चिती होणे जरुरीचे होते. शिक्षण व एका वर्षांची सक्तीची सरकारी नोकरी पूर्ण झाल्यावर, नवी नोकरी मिळेपर्यंत एखाद्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी व्यवसायाला सुरुवात करण्याचा त्यांचा विचार आहे. बधिरीकरणतज्ज्ञाला दिवसभरात तीन ते चार शस्त्रक्रियांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत उपस्थित असावे लागते. जाण्या-येण्यास सोयीचे म्हणून एक चार चाकी वाहन असावे व वाहन खरेदी करण्यास वाहनाच्या किमतीच्या ८० टक्के कर्ज घेतले तरी २० टक्के रक्कम स्वत:ची असावी लागते. यासाठी ५० हजारांची तरतूद करणे हे पहिले ध्येय निश्चित केले. पुढील एक-दोन वर्षांत त्यांचा विवाह करून देण्याचा आई-वडिलांचा विचार आहे. साहजिकच मुंबई-पुणे परिसरात एखादी सदनिका घेण्यासाठी भावी पतीच्या जोडीला पाच-सात लाखांचे बीज भांडवल जमवणे हे दुसरे वित्तीय ध्येय निश्चित केले.
डॉ. श्रद्धा यांना मिळणाऱ्या विद्या वेतनातून ५६ हजारांचे शैक्षणिक शुल्क भरावयाचे आहे. तसेच प्रासंगिक खर्चाची तरतूदही करावयाची आहे. हे पसे त्यांनी बँकेत आपल्या बचत खात्यात ठेवले तर त्यांना चार टक्के व्याज मिळेल. मात्र हेच पसे त्यांनी लिक्विड अथवा शॉर्ट टर्म बाँड फंडसारख्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतविली तर परतावा आठ टक्क्यांच्या (रेपो दराच्या) जवळपास असेल. म्हणून त्यांना दरमहा दहा हजार गुंतविण्यासाठी दोन निर्गमन शुल्क (एक्झिट लोड) नसलेले फंड सुचविण्यात आले आहेत. या फंडांचा त्यांनी आपल्या बचत खात्यासारखा वापर करावा. दरमहा ठरावीक रक्कम या फंडात गुंतवावी व ज ेव्हा गरज असेल तेव्हा या फंडातून काढून घ्यावी.
घर घेण्यासाठी गंगाजळी तयार करण्यासाठी आठ हजारांची एसआयपी करण्यासाठी चार फंड सुचविण्यात आले आहेत. यापकी दोन लार्ज कॅप तर दोन मिडकॅप व स्मॉल कॅप यांमध्ये गुंतवणूक करणारे फंड आहेत. या फंडातील एसआयपी निदान पाच वष्रे सुरू राहावी अशी अपेक्षा आहे. पाचव्या वर्षांच्या अखेरीस निदान पाच लाखांची रक्कम हाती यावी, अशा अपेक्षेने ही गुंतवणूक सुचविली असली तरी निदान वर्षांतून एकदा याचा आढावा घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसायात असलेल्यांनी आपल्या व्यावसायिक जोखमीचे नियोजन करणे हे महत्त्वाचे असते हा धडा या निमित्ताने घेता येईल.
डॉ. श्रुती यांनी आपल्या वित्तीय नियोजनासाठी करावयाच्या गोष्टी
दीड कोटीचा मुदतीचा विमा पुढील दहा वर्षांत विम्याचे कवच पाच कोटी पर्यंत वाढविणे
व्यावसायिक नुकसानभरपाईसाठी विमा छत्र  
संपूर्ण कुटुंबासाठी पाच लाखांचे आरोग्य विमा छत्र         
शैक्षणिक शुल्कासाठीची तरतूद         
चारचाकी वाहन खरेदी करण्यास खर्चाची तरतूद
मध्यमकालीन भविष्यातील खर्चासाठी तरतूद
दीर्घकालीन भविष्यातील खर्चासाठी तरतूद
सर्वोत्तम ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ असलेल्या पहिल्या चारपकी एका विमा कंपनीची पॉलिसी
कोणत्याही सामान्य विमा कंपनीच्या योजनेची खरेदी
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीची ‘फॅमिली फ्लोटर’ योजना
डीएसपी ब्लॅक रॉक शॉर्ट टर्म अथवा एलआयसी नोमुरा सेव्हिंग्ज प्लस (ग्रोथ)
एचडीएफसी हाय इंटरेस्ट फंड अथवा डीएसपी ब्लॅकरॉक इन्कम अपॉच्र्युनिटी फंड
एचडीएफसी इक्विटी किंवा आयसीआयसीआय प्रूडेन्शियल फोकस ब्लूचीप         
यूटीआय मिडकॅप फंड अथवा डीएसपी ब्लॅक रॉक मायक्रो कॅप फंड

रुग्ण दगावणे अथवा रुग्णास कायमची इजा होणे, हा वैद्यक व्यवसायातील धोका आहे. व्यायसायिक हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचे नातेवाईक नुकसान भरपाईचा दावा करू शकतात. अशा संभाव्य नुकसान भरपाईपासून संरक्षण देणारी (Professional Indemnity Policy) विमा पॉलिसी प्रत्येक वैद्यक व्यावसायिकाने घेतलीच पाहिजे.