मेष
दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावे. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावे. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावे. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार, उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – गडद निळा

वृषभ
आज पांढऱ्या वस्तूचे दान दत्त मंदिरात करावे. ओम श्री आदि गुरूवे नम: या मंत्राचा जप करावा. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
ओम द्रां द्री दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करणे. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – सोनेरी

कर्क
ओम द्रां द्री दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करणे. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – लाल

सिंह
ओम शांभवे नम: या मंत्राचा जप करणे. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
ओम श्री आदि गुरूवै नम: या मंत्राचा जप करावा. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडाशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायांमध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – हिरवा

तुळ
दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करणे. ओम श्री आदि गुरूवै नम: या मंत्राचा २१ वेळा जप करावा. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहेत. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – फिकट हिरवा

वृश्चिक
ओम श्री दत्तात्रयाय नम: या मंत्राचा जप करावा. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामाचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम योजना. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – नारंगी

धनु
गणपती पूजन, अथर्व शीर्षाचे पठण करावे. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

मकर
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करणे. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी सावधानताव बाळगावी. प्रवासाचे योग
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
लक्ष्मी अष्टकाचे पाठ करणे. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – निळा

मीन
ओम द्रा दत्तात्राय नम: या मंत्राचा जप करावा. सकाळी साडेदहानंतर चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदे’शाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu