हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या अमोल भालेराव आणि त्याच्या साथीदाराचा बँक लुटण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून तीन जण फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चाकू ,कटर, गुंगीचे औषध जप्त करण्यात आले. औरंगाबाद शहरातील जलनारोडवरील आयडीबीआय बँकेत लुट करण्याच्या इराद्याने आले होते. बुधवारी पहाटे पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह जालना रोड परीसरात गस्त घालत असताना ५ तरुण त्या ठिकाणी संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले.

पोलिसांना पाहाताच या तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अमोल जनार्धन भालेराव (वय १९) आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी पकडले. अमोलच्या अटक करण्यात आलेल्या साथीदाचा घरफोडीच्या काही गुन्ह्यात समावेश असल्याचे तपासात लक्षात आले. दोघांनी बँक लुटण्यासाठीच आलो होतो, अशी कबुली दिली. आरोपीची झडती घेतली असता त्यांच्या जवळ कटर, चाकू, गुंगीचे औषध, व इतर हत्यारे ,साहित्य पोलिसाना मिळाले. . मागील तीन ते चार दिवसांपासून परिसराची पाहणी करत होते. त्यांच्या टोळीचा म्होरक्या परप्रांतीय असून बँक लुटून मूळ गावी परत जाण्याचा त्यांचा बेत होता. तीन फरार आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.