25 September 2017

News Flash

जाहिरातीसाठी हिंदू देवतांची छायाचित्रं वापरल्याने जावेद हबीब यांच्या सलूनवर शाईफेक

भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निषेध

औरंगाबाद | Updated: September 6, 2017 5:11 PM

औरंगाबाद : हेअर स्टायलिश जावेद हबीब यांच्या सलूनवर शाई फेकण्यात आली.

जाहिरातीसाठी हिंदू देव-देवतांच्या छायाचित्रांचा वापर केल्याने औरंगाबादमध्ये सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला निषेधही नोंदवला.

हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही वर्तमानपत्रांमध्ये आक्षेपार्ह जाहिरात दिल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. जाहिरातीमध्ये हिंदू देवी-देवता हबीब यांच्या सलूनमध्ये आल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचे या भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच औरंगाबाद शहरातील कॅनॉट परिसरातील जावेद हबीब सलून समोर निदर्शने करत शाईफेक करण्यात आली.

जावेद हबीब यांच्या ट्विटर हँडलवरून ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यामांनी दिले आहे. ट्विटरवरील या पोस्टनंतर अनेकांनी हबीब यांना याचा जाब विचारला. त्यानंतर या प्रकरणी हबीब यांनी ट्विटरवरून माफी देखील मागितली.

First Published on September 6, 2017 4:42 pm

Web Title: in spread on jawed habibs saloon after using photographs of hindu deities for advertisement
 1. U
  Ulhas
  Sep 7, 2017 at 12:40 pm
  विरोध आणि वाचकांच्या प्रतिक्रिया बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. पत्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे कि पोस्टर अनावधानाने नव्हे तर त्यांच्या अपरोक्ष आणि त्यांच्या परवानगीशिवाय छापले आहे. तरीही त्यांनी माफी मागितली आहे आणि सर्व म्याटर मागे घ्यायची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे विरोध करणे आणि शाई-बेई फेकण्याची पोराटकी बंद करा.
  Reply
  1. S
   swapnil navade
   Sep 7, 2017 at 7:14 am
   फक्त प्रतिक्रिया छापता?
   Reply
   1. A
    Ameya
    Sep 7, 2017 at 12:42 am
    नाव जावेद मग याने स्वतःच्याच धर्मातील थोर पुरुषांचाच वापर केला असता तर अधिक बरे झाले असते. उलटपक्षी ती अधिक वास्तववादी जाहिरात ठरली असती कि ते थोर पुरुष दाढी करून घ्यायला आलेले आहेत. हे बरे आहे, कुणीही उठावं आणि देवी देवतांबद्दल बोलावं , त्यांची आक्षेपार्ह चित्रं काढावीत, त्यांची खिल्ली उडवणारे सिनेमे काढावेत, हे सगळं चालतं कारण आपल्याकडे लोकशाही आहे आणि आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. एक क ेश तिवारी उठतो, आक्षेपार्ह विधान करतो तर थेट NSA कायद्या अंतर्गत तुरुंगात. बहुदा लोकशाही आणि स्वातंत्र्य वगैरेंच्या व्याख्या या सोयीस्कररीत्या बदलत असतात, किंवा त्या बदलल्या जातात. िष्णुता वगैरे फक्त ठराविक लोकांनीच दाखवायची असते.
    Reply
    1. A
     abhay
     Sep 6, 2017 at 7:23 pm
     ह्याला काय म्हणतात आधी शेण खा,मग माफी माग
     Reply