18 August 2017

News Flash

मराठा मोर्चाहून परतताना अपघात; ६ जण ठार

अपघातात औरंगाबाद आणि मुंबईच्या तरुणांचा समावेश

औरंगाबाद | Updated: August 10, 2017 5:17 PM

वैजापुर तालुक्यातील नांदगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला.

मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाहून परतताना झालेल्या अपघातांमध्ये एकूण सहा जणांचा  मृत्यू झाला आहे. मुंबईतील वडाळा परिसरात काल संध्याकाळी ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर औरंगाबादमध्ये नांदगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारमधून हर्षल अनिल घोलप (वय, २८  पुणे), नारायण कृष्‍णा थोरात (वय, २१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे आणि गौरव प्रजापती (वय, २३, रा. बजाज नगर, जि. औरंगाबाद) यांच्यासह आणखी दोघे जण या कारमधून प्रवास करत होते. यातील चार जणांचा मृत्यू झाला असून दोघांना  उपचारासाठी वैजापूर येथील  रूग्‍णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

मुंबईत बुधवारी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरून संध्याकाळी सहाच्या सुमारास विनायक ढगे, विल्सम जोसेफ, सिद्धार्थ म्हसे आणि सिद्धार्थ चव्हाण हे मोटरसायकलवरून चेंबूर येथे घरी परतत असताना अपघात झाला होता.  भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाजवळ एका ट्रकने त्यांना उडवले. या अपघातात विनायक आणि सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला होता. तर सिद्धार्थ चव्हाण हा गंभीर जखमी आहे.

 

First Published on August 10, 2017 12:57 pm

Web Title: maratha kranti mook morcha vehicle accident in aurngabad four people death and two injured
 1. V
  varad
  Aug 11, 2017 at 12:03 pm
  ईश्वर मृतांच्या आत्म्यांस शांती देवो . दुर्दव असे मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या जल्पकांनी ही बातमीसुद्धा सोडली नाही . ह्या बातमीवर दुर्देवी कंमेंट करणाऱ्यांना माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते . जाती साठी माणूस पशु होतो हेच खरे ...!! आणि ज्यांना स्वतःच्या गरीब जात बंधू बद्दल काही वाटत नाही ते देशबाधवांबद्दल काय आत्मीयता ठेवणार ......शेवटी हे सगळे बाहेरून आलेले निर्वासित चा आहेत म्हणा.
  Reply
 2. V
  varad
  Aug 11, 2017 at 11:59 am
  शरद पवार यांनी कॅन्सर वर मात केलीय .....अगर असेच बोलाचे असेल तर माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे तर बोलणे व हालचाल करणे बंद झालंय. परावलंबी जीवन जगात आहेत ते.
  Reply
 3. V
  varad
  Aug 11, 2017 at 11:50 am
  तुमच्या डोक्यावर जितके केस नसतील ना तितके आणीबाणीचे प्रसंग आणि लोक शरद पवार यांनी अनुभवले आहेत.... लाखो लोकांचा प्रवास व त्यातील धोका ओळखून चा त्यांनी सावधान्यतेचा इशारा दिला होता ..!! त्यातच त्यांचे द्रष्टेपण आले. ...! ईश्वर मृतांच्या आत्म्यांस शांती देवो ..!!!
  Reply
 4. E
  eak maratha lakh maratha
  Aug 10, 2017 at 6:38 pm
  हा राजकारण्यांनी घेतलेला बळी आहे आता तरी तुमच्या आत्मयला शांती मिळाली का आणखी जीव जायनायची वाट पाहताय सलाम तुमच्या कार्याला हेच दिवस पाःचे राहिले होते
  Reply
 5. R
  ramdas
  Aug 10, 2017 at 2:00 pm
  ईश्वर मृतांच्या आत्म्यांस शांती देवो . दुर्दव असे मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या जल्पकांनी ही बातमीसुद्धा सोडली नाही .
  Reply
 6. A
  Arun
  Aug 10, 2017 at 1:58 pm
  मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा- शरद पवार अशी हेडिंगची बातमी काल संध्याकाळीच वाचली तेव्हाच संशयाची पाल चुकचुकली.
  Reply
 7. P
  pradeep jadhav
  Aug 10, 2017 at 1:42 pm
  एका वाकड तोंड्याने परतीच्या प्रवासाबद्दल शुभेछया दिल्या होत्या.
  Reply
 8. S
  Shriram Bapat
  Aug 10, 2017 at 1:15 pm
  नोटबंदीकाळात रांगेत उभे असताना कथित मृत्यू झालेल्यांचा आकडा मराठा मोर्च्यात सामील झालेल्यांच्या मृत्यूच्या आकड्याने पार केला.
  Reply
 9. Load More Comments