22 August 2017

News Flash

अनधिकृत धार्मिक स्थळं वाचवण्यासाठी शिवसेना खासदाराची कोर्टात धाव

समाधानकारक प्रतिसाद आला नाही तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

औरंगाबाद | Updated: July 31, 2017 6:53 PM

कोर्टाकडून समाधानकारक प्रतिसाद आला नाही तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे खैरे म्हणाले.

उच्च न्यायालयाच्या आदेशांतर औरंगाबाद महापालिकेने अनधिकृत बांधकाम हटविण्याची मोहीम हाती घेतली. शहरातील ११०० बांधकामापैकी रस्त्यावर येणारी धार्मिक स्थळं हटविण्यात येत आहेत. अजूनही अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा मारण्याचे काम सुरु आहे. त्याविरोधात औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी कोर्टात धाव घेतली. सोमवारी खैरे यांनी कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली.

शहरात ११०० पेक्षा जास्त अनधिकृत धार्मिक स्थळं आहेत. ही स्थळं तात्काळ हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला. त्याबाबत महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा देखील घेण्यात आली. त्यामध्ये पालिकेने चुकीच्या पद्धतीनं धार्मिक स्थळांची यादी केली असून त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. कारवाई करताना तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे कारवाईसाठी महापालिका असमर्थ असेल, तर सर्वोच्च न्यायालयात आवाहन करावं, असे उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं असल्याचं सांगत शिवसेना नगरसेवकांनी कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मागणी केली होती. मात्र आयुक्तांकडून कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण कोर्टाकडून पोलीस बंदोबस्त देण्यात आल्यामुळे पालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई सुरु केली.

पालिका अनधिकृत धार्मिक स्थळावर हातोडा चालवत असताना जनतेच्या विरोधालाही काही ठिकाणी सामोरं जावं लागलं. तरीही पोलीस बंदोबस्तसोबत घेऊन कारवाई करण्यात आली. एकीकडे कारवाई सुरु असताना दुसरीकडे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी कोर्टात धाव घेतली. श्रावण महिना सुरु आहे. जनतेच्या भावना लक्षात घेता कारवाई होणे उचित नाही, असे सांगत  हस्तक्षेप याचिका दाखल केली असल्याचं खैरे यांनी सांगितले. कोर्टाकडून समाधानकारक प्रतिसाद आला नाही तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे खैरे म्हणाले.

First Published on July 31, 2017 6:35 pm

Web Title: unauthorized religious place shiv sena mp chandrakant khaire submit petition in high court
 1. K
  kharat
  Aug 1, 2017 at 12:17 pm
  वाहतुकीचा प्रश्नांची गंभीरता पाहता राजकारण्यांनी धार्मिकतेचा बाऊ करू नये ! भर चौकात गणपती मांडव /देवस्थानामुळे होणारी कोंडी हयातून मार्ग काढणे हे जरुरीचे आहे !
  Reply
 2. V
  Vijay
  Aug 1, 2017 at 10:50 am
  ह्या नालायक माणसाने सुंदर ऐतिहासिक औरंगाबाद शहराची पुरेपूर वाट लावली आहे. ह्याची लायकी फक्त नगरसेवक बनण्याची आहे दिल्लीत लोकसभेत ह्याचे तोंड उघडत नाही फक्त शहरातच बोंबा मारत फिरत असतो. शहराच्या विकासासाठी ह्याचे कवडी चे सुद्धा योगदान नाहीये. विकास कामांमध्ये खोडा घालणे व मनपाच्या कामामध्ये लुडबूड करणे हाच ह्याचा नेहमीचा उद्द्योग. आणि निवडणूक आल्या कि फक्त एखादे धार्मिक स्थळ बनवून देणार आणि जिंकून येणार हेच लावलय ह्याने गेल्या १६ वर्षांपासून. औरंगाबाद शहराच्या अधोगतीला हाच माणूस जबाबदार आहे. कुणीही चांगला मनपा आयुक्त आला तर त्याला मनपा वर टिकू देत नाही किंवा जर तो चांगले कामे करणारा निघाला तर त्याची बदली करणे हेच कामे करतो. खरे तर औरंगाबाद ची जनता मूर्ख आहे जे ह्याच्या सारख्या नालायकाला शिवसेनेच्या नावाखाली गेल्या १६ वर्षांपासून निवडून देत आहेत.
  Reply
 3. G
  Ganeshprasad Deshpande
  Jul 31, 2017 at 7:59 pm
  हरकत नाही. खैरे यांच्या सर्व याचिकांवर निर्णय लागेपर्यंत आयुक्तांनी यादीतली सर्व बेकायदा धार्मिक स्थळे तोडून प्रश्नच संपवून टाकावा. याचिका डेरेदाखल आणि काम पूर्ण.
  Reply