व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणात ब्रिटन आज जगात अग्रेसर आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. म्हणूनच भारतातून एमबीए किंवा व्यवस्थापनातील इतर पदव्या घेण्यासाठी परदेशी जाणऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज अमेरिकेपेक्षा ब्रिटनमध्ये जास्त आहे. अनुभवी व उत्तम दर्जाचा प्राध्यापकवर्ग, व्यवस्थापनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चालणारे संशोधन, त्या संशोधनासाठी विद्यापीठातील अनेक रिसर्च सेंटर्सना असलेले औद्योगिक पाठबळ व सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा या गोष्टींमुळे आज ब्रिटनमध्ये केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, इम्पिरियल, लंडन स्कूल ऑफ बिझनेस यांसारखी जागतिक दर्जाची अनेक विद्यापीठे आहेत. बाथ विद्यापीठ हेदेखील याच नामावलीतील. ‘संडे टाइम्स’च्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार बाथ विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ बिझनेस’ला ब्रिटनमधील प्रथम क्रमांकाचे, तर तेथील व्यवस्थापन संशोधन केंद्राला पाचव्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून गौरवण्यात आले आहे. याच विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट’कडून ऑक्टोबर २०१३ ला सुरू होणाऱ्या पीएच.डी.साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी
वर उल्लेख केल्याप्रमाणे बाथ विद्यापीठ हे व्यवस्थापन आणि उद्योजकता संशोधनासाठी ब्रिटनमधील एक अग्रगण्य व नामांकित विद्यापीठ आहे. विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट’मध्ये अध्यापन व संशोधनासाठी जवळपास शंभरच्या आसपास विद्वान व अनुभवी प्राध्यापकवर्ग उपलब्ध आहे. या स्कूलला फक्त संशोधनातून मिळणारे वार्षकि उत्पन्न २० लाख युरोपेक्षाही अधिक आहे. चालू वर्षी या स्कूलमध्ये २,१०० विद्यार्थी असून त्यापकी एमबीएसाठी २००, इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ४५०, डॉक्टरेटसाठी २१० जण तर ११०० पेक्षाही अधिक विद्यार्थी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. फक्त पीएच.डी.बद्दल बोलायचे झाले तर बाथ विद्यापीठात पीएच.डी. अर्धवेळ  व पूर्णवेळ अशी दोन्ही प्रकारे करता येते. मात्र, या शिष्यवृत्तीसाठी पूर्णवेळ विद्यार्थ्यांनाच विचारात घेतले जाते.
आवश्यक पात्रता
ही शिष्यवृत्ती आंतरराष्ट्रीय, युरोपियन व ब्रिटनमधील सर्व अर्जदारांना खुली आहे. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा कएछळर (कल्ल३ी१ल्लं३्रल्लं’ एल्लॠ’्र२ँ छंल्लॠ४ंॠी ळी२३्रल्लॠ र८२३ीे) या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ॅफए, ॅटअळ इत्यादी परीक्षा या शिष्यवृत्तीसाठी गरजेच्या नाहीत. मात्र दिल्या असतील तर उत्तमच.
शिष्यवृत्तीबद्दल
बाथ विद्यापीठाची ही शिष्यवृत्ती व्यवस्थापन-उद्योजकता क्षेत्रातील जागतिक बुद्धिमत्तेला आकर्षति करत असते. या शिष्यवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांला दरवर्षी साधारणत: अठरा हजार युरो एवढी रक्कम दिली जाते. यामध्ये त्याची टय़ुशन फी व निवासासाहित इतर सर्व खर्च अपेक्षित आहे. मात्र शिष्यवृत्तीचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या वर्षांच्या निकालावर अवलंबून असेल. उद्योजकतेच्या या पीएच.डी.मध्येच विद्यार्थ्यांला एकूण दोन पदव्या – ‘मास्टर इन रिसर्च’ म्हणजेच ट.फी२. व पीएच.डी. दिल्या जातील.    

अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन (https://www.bath.ac.uk/study/pg/applications.pl ) करायचा असल्याने अर्जदाराने अर्ज करताना स्वत:बरोबर खालील गोष्टी तयार ठेवलेल्या असाव्यात.
१) एसओपी (Statement of Purpose) – ज्यामध्ये तो या शिष्यवृत्तीसाठी अर्ज का करत आहे, ही शिष्यवृत्ती त्याला का दिली जावी, उद्योजकतेमध्ये त्याला पीएच.डी. का करायची आहे इत्यादी बाबींची कारणे त्याला याच क्रमात लिहावी लागतील.
२) स्वत:चे शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव, इ. बाबींनी सज्ज सीव्ही.
३) दोन तज्ज्ञांचे ई-मेल आयडीज् व मोबाइल नंबर्स ज्यायोगे विद्यापीठ त्यांच्याकडून शिफारसपत्र घेईल.
४) शैक्षणिक पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्राची ट्रान्सक्रिप्ट्स किंवा त्याची ई-कॉपी, ळडएाछ/कएछळर चे गुण व जर असतील तर ॅफए, ॅटअळ चेसुद्धा.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ मार्च २०१३ आहे.
महत्त्वाचे दुवे
https://www.bath.ac.uk/study/pg/applications.pl
http://www.bath.ac.uk/management/
E-Mail: pgradmin@management.bath.ac.uk