केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या सबइन्स्पेक्टर (स्टेनो) या स्पर्धा परीक्षेद्वारा स्टेनोग्राफर्सची निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत. राज्यातील स्टेनोग्राफी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अधिकारी पदासह करिअर सुरू करण्याची इच्छा असल्यास त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.

  • जागांची संख्या व तपशील- या स्पर्धा परीक्षेद्वारा निवड केल्या जाणाऱ्या जागांची एकूण संख्या ७९. यापैकी ३९ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध असून १६ जागा इतर मागासवर्गीय, ८ जागा अनुसूचित जातीच्या तर १६ जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
  • आवश्यक पात्रता- उमेदवारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांनी टंकलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट, इंग्रजी टंकलेखनाची ५० शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ६५ शब्द प्रतिमिनिट पात्रता संगणकीय पद्धतीने पूर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा- अर्जदारांचे वय २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट सरकारी नियमांनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ५ वर्षांनी तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षांनी शिथिलक्षम आहे.
  • शारीरिक पात्रता- पुरुष उमेदवारांसाठी त्यांची उंची १६५ सेंटीमीटर्स असावी. छाती ७७ सेंटीमीटर्स व फुगवून ८२ सेंटीमीटर्स असावी. महिला उमेदवारांची उंची १५५ सेंटीमीटर्स असावी. छाती ७६ सेंटीमीटर्स व फुगवून ८१ सेंटीमीटर्स असावी.
  • विशेष सूचना- शारीरिक पात्रतेचे निकष सरकारी नियमांनुसार अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहेत.
  • निवड प्रक्रिया-अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा २ तास कालावधीची व १०० गुणांची असेल. निवड परीक्षेमध्ये उमेदवारांची बौद्धिक क्षमता, सामान्य ज्ञान, मूलभूत विज्ञान, इंग्रजी, हिंदी व गणित या विषयांचा समावेश असेल.
  • याशिवाय उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात येईल व त्यामध्ये १० मिनिटे कालावधीतील ८०० शब्दांचे लघुलेखन व संगणकीय पद्धतीने इंग्रजीतील ५० शब्द प्रतिमिनिट तर हिंदीतील ६५ शब्द प्रतिमिनिट गतीची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

वरील निवड परीक्षांमध्ये निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे मुलाखत व वैद्यकीय चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

  • वेतनश्रेणी व फायदे – निवड झालेल्या उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात असिस्टंट सबइन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर) म्हणून ५२००- २०२०० + २८०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.

वरील वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेपण देय असतील.

  • अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु.चा असिस्टंट कमांडंट (डीडीओ), सीआयएसएफ वेस्ट झोन, खारघर, नवी मुंबई यांच्या नावे असणारा इंडियन पोस्टल ऑर्डर पाठविणे आवश्यक आहे. पोस्टल ऑर्डर जीपीओ मुंबई येथे देय असावा.
  • अर्जाचा नमुना व तपशील- अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ६६६.्रू२ऋ.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि इंडियन पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (वेस्टर्न झोन-१), सीआयएसएफ कॉम्प्लेक्स, वेस्टर्न झोन- १ हेडक्वार्टर्स, सेक्टर ३५, खारघर, नवी मुंबई- ४१०२१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१७.