सध्या जिकडेतिकडे चर्चा आहे ती, मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या योजनांची. मेक इन इंडियामुळे  बिलियनपेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यापकी बऱ्याचशा संधी अर्थशास्त्र घेऊन पदवी, पदव्युत्तर शिक्षण, एमफिल, पीएचडी करणाऱ्यांना आहेत.  अांतरराष्ट्रीय, सूक्ष्म, स्थूल, सार्वजनिक राजस्व, राजकीय, श्रम, औद्योगिक, कृषी, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, लोकसंख्या, इ. अर्थशास्त्राच्या शाखा आहेत. यापकी कोणत्याही शाखेत आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला वाहतूक, दळणवळण, विपणन, वित्तीय क्षेत्रे, व्यापार, वृत्तपत्र, पर्यटन, संशोधन, सांख्यिकी विभाग, बँका, बहुराष्ट्रीय कंपन्या यांमध्ये रोजगारांच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत.

बँक प्रोबेशनरी ऑफिसर – अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर वा उच्चशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना स्टेट बँक आणि रिझव्‍‌र्ह बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून संधी आहेत. त्यासाठी १०० गुणांची ऑनलाइन पूर्वपरीक्षा द्यावी लागते. यानंतर मुख्य परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखत यामार्गे उमेदवाराची अंतिम निवड होते.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

केंद्रीय सांख्यिकी विभाग – अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर केंद्र आणि राज्य  सरकारच्या सांख्यिकी विभागामध्ये संशोधन साहाय्यक, सांख्यिकी साहाय्यक संशोधन विश्लेषक म्हणून संधी आहे. शिवाय या विभागाकडून निरनिराळी सर्वेक्षणे करण्यासाठी पूर्णवेळ वा अर्धवेळ रोजगार दिला जातो.

कृषी अर्थतज्ज्ञ – कृषी क्षेत्रात आवड असल्यास तुम्हाला कृषी अर्थतज्ज्ञ म्हणूनही काम करता येईल. त्यासाठी पदवी व पदव्युत्तर वर्षांला कृषी अर्थशास्त्र हा विषय घ्यावा लागतो. त्यानंतर त्यात एमफिल वा पीएचडी केल्यावर ही संधी उपलब्ध होते.

भारतीय आíथक सेवा (Indian Economic Services)- केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासन सेवे (आयएएस)प्रमाणेच भारतीय आíथक सेवा (आयईएस)या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परिषदेचे आयोजन केले जाते. २१ ते ३० या वयोगटातील अर्थशास्त्र किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा वर्षांतून एकदाच होते. यंदा ८ फेब्रुवारी २०१७ला तिची अधिसूचना जारी होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मार्च २०१७ असून ही परीक्षा १२ मेला होईल. जी साधारण ३ दिवस चालणार आहे.

अर्थतज्ज्ञ – अर्थशास्त्रात पीएचडी वा एमफिल केल्यास विविध क्षेत्रांत अर्थतज्ज्ञ म्हणून काम करता येते. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात कमोडिटी ब्रोकर, बँक व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वित्तीय विश्लेषक, इकॉनॉमिक फोरकास्टर, गुंतवणूक बँकर, कर्ज मार्गदर्शक आणि सुरक्षापत्रे विश्लेषक म्हणुन काम करण्याच्या संधी आहेत.  सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये दावे परीक्षक, विदेशी व्यापार विश्लेषक, कर तपासनीस, सार्वजनिक प्रशासक, क्षेत्रीय/ शहरी नियोजक, वित्तीय नियोजक इत्यादीमध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून रोजगार उपलब्ध आहे. त्याचबरोबर संदेशवहन क्षेत्रामध्येही  प्राध्यापक, तांत्रिक लेखक, वृत्तपत्र/स्तंभलेखक, उच्चशिक्षण प्रशासक, शैक्षणिक वाहिन्या सल्लागार, माहिती विश्लेषक इत्यादी स्वरूपाच्या रोजगारविषयक संधी उपलब्ध आहेत.

विदेश सेवा अधिकारी –  विदेश सेवेमध्ये आíथक अधिकारी म्हणूनही अर्थशास्त्रातील विद्यार्थ्यांला करिअर करता येते. कारण या अधिकाऱ्याला विविध देशांशी उत्तम संबंध राखताना अर्थशास्त्र आणि विदेशी सेवेचे सखोल ज्ञान आवश्यक असते. शिवाय त्याला व्यापारी संस्था, सरकार, विरोधी पक्ष, बिगर सरकारी संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादींशी संबंध राखावे लागतात. त्याला सरकारकडूनही प्रशिक्षण मिळते. विदेशी अधिकाऱ्यासाठीच्या परीक्षा मात्र यूएसएकडून आयोजित केल्या जातात.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध विभागांमध्ये नोकरीची संधी –  संरक्षण खात्यातील राष्ट्रीय संरक्षण सेवा परीक्षा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागातील विविध विभागांसाठी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येतात.

शैक्षणिक संस्था-

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स,  इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई, भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकत्ता, गोखले राजकीय आणि अर्थशास्त्र संस्था पुणे, मद्रास स्कूल ऑफ इकॉनमिक चेन्नई, इत्यादी.

अभ्यासक्रम

अर्थशास्त्राच्या जोडीला अनेक अल्पकाळाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जसे की,  इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, इन्स्टिटय़ूट ऑफ होम इकॉनमिक्स या संस्था अल्पकालीन स्वरूपाचे अभ्यासक्रम चालवितात. जसे अ‍ॅडव्हान्स सर्टििफकेट कोर्स इन फायनान्शिअल मार्केटिंग, अ‍ॅडव्हान्स सर्टििफकेट कोर्स इन इंटरनॅशनल फायनान्स, अ‍ॅडव्हान्स सर्टििफकेट कोर्स इन म्युच्युअल फंड, अ‍ॅडव्हान्स सर्टििफकेट कोर्स इन इन्शुरन्स, इ. पूर्ण केल्यानंतर विविध प्रकारच्या वित्तीय संस्था, खासगी संस्था, सरकारी संस्था, बिगर सरकारी संस्था इत्यादींमध्ये रोजगार मिळू शकतो.

स्वयंरोजगार

अर्थशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पादनखर्च, नफा, व्यवसाय यासोबतच प्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यास इत्यादीची माहिती असते. त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ इत्यादी प्रकारच्या प्रशिक्षण संस्थांकडून विविध प्रकारच्या उद्योगांचे प्रशिक्षण मिळू शकते. ज्या उमेद्वारांनी शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांकडून प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांना बँका, वित्तीय संस्थांकडून स्वयंरोजगारासाठी साहाय्य मिळते.

 (लेखक प्रगती कॉलेज, डोंबिवली येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)