केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयात सांख्यिकी अन्वेषकांच्या १७ जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ जून ते १ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१६.

सीमा सुरक्षा दलात सहायक निरीक्षकांच्या १५२ जागा– उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व रेडिओ अ‍ॅण्ड टीव्ही टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल वा संगणकविषयक पदविकाधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, सीएसडब्ल्यूटी- बीएसएफ इंदौर, बिजासन रोड, इंदोर- ४२५००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१६.

भारतीय वायुदलाच्या हवामान विभागीतल संधी : अर्जदारांनी विज्ञान, गणित, सांख्यिकी, भूगोल, संगणकशास्त्र, पर्यावरण विज्ञान, भौतिकशास्त्र, कृषी, हवामानशास्त्र, यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २६ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा वायुदलाच्या http://www.careeairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०१६.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबाद येथे स्टेनोग्राफर्सच्या ३ जागा- उमेदवार बारावी उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट वर टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी http://www.icmr.nic.in अथवा http://www.nioh.org या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, मेघानी नगर, अहमदाबाद ३८००१६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०१६.

सशस्त्र सीमादलात कॉन्स्टेबलच्या २०६८ जागा- अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत अथवा वाहन चालनाचा परवानाधारक असावेत व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे. मिनरल एब्बोरेशन कॉर्पोरेशन, नागपूर येथे अकाऊंटंटच्या २ जागा- उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण व इंटर सीएला आयसीडब्ल्यूए यासारखे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ जून ते १ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित जालेली जाहिरात पाहावी अथवा http://www.mecl.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०१६.

नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये मार्केटिंग रिप्रेंझेंटेटिव्ह्जच्या ३० जागा- अर्जदार कृषी विषयातील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ जून ते १ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://www.nationalfartilizers.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०१६.

डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिऑलॉजी अ‍ॅण्ड अलाईड सायंसेस, दिल्ली येथे ज्युनिअर रिसर्च फेलोच्या ६ जागा- अर्जदार लाइफ सायन्सेसमधील पदव्युत्तर पदवीधर अथवा पदवीधर इंजिनीअर असावेत. व त्यांनी नेट/ गेट यासारख्या पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी सकाळी १० वा. डिफेन्स इंस्टीटय़ूट ऑफ फिजिऑलॉजी अ‍ॅण्ड अलाईड सायंसेस, लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली- ११००५४ या पत्त्यावर उपस्थित राहण्याची तारीख २१ जुलै २०१६.

सैन्यदलाच्या दंत चिकित्सा विभागात ४२ जागा- अर्जदार बीडीएस/ एमडीएस यासारखी पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ४५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ जून २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१६.
शारीरिक विकलांग उमेदवारांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती. पात्रता – (अ) शारीरिकरीत्या अपंगत्व (ओएच) (ब) मूकबधिर (एचएच) (क) अंध (व्हीएच). पदांचा तपशील/पात्रता – (१) एचआर – एमबीए/एमएसडब्ल्यू/एमए इ. (२) लीगल – पदवी (कायदा) (३) फिनान्स – सी.ए. (४) कार्यालयीन भाषा (हिंदी) (५) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – बी.ई. (६) संगणकशास्त्र इंजिनीअरिंग – बी.ई. पदवी परीक्षेत किमान ५०. गुण आवश्यक. वयोमर्यादा – पद क्रमांक (१) आणि (४) साठी ३७ वष्रे. इतर पदांसाठी ३५ वष्रे. एक वर्षांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर उमेदवारांना ‘एक्झिक्युटिव्ह’ या पदावर घेतले जाईल. वेतन – ११.५ लाख वर्षांसाठी (सीटीसी) ऑनलाइन पद्धतीने अर्ज <https://bharatpetroleum.com/careers/careers.aspx&gt; या संकेतस्थळावर २० जुलै २०१६ पर्यंत करावेत.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, बंगलोर आपल्या म्हैसूर (कर्नाटक), सालबोनी (पश्चिम बंगाल) येथील मुद्रण कारखान्यात ‘इंडस्ट्रियल वर्कमन ग्रेड-१’ पदांची भरती (एकूण पदसंख्या – १२०, अजा – १८, अज – ९, इमाव – ३२, अराखीव – ६१). पात्रता – (१) िपट्रिंगमधील पदविका किमान ५५. गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी किमान ५० गुण). (२) किमान एक वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा – १८ जुल २०१६ रोजी १८-२८ वष्रे. (कमाल वयोमर्यादा अजा/अजसाठी ५ वर्षांनी आणि इमावसाठी ३ वर्षांनी शिथिलक्षम.) परीक्षा शुल्क – २०० रुपये (अजा/अज/विकलांग यांना फी माफ) वेतन – एक वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान दरमहा १६,००० रुपये स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षणानंतर एक वर्ष प्रोबेशन कालावधी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://www.brbnmpl.co.in या संकेतस्थळावर १६ जुलै २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

भारतीय नौसेनेत १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण उमेदवारांना इंजिनीअर/आर्किटेक्ट होण्याची सुवर्णसंधी. १०+२ (बी.टेक्.) कॅटेड एन्ट्री स्कीम कोर्स जानेवारी २०१७. पात्रता – १२ वी परीक्षा पीसीएम विषयांत किमान ७० गुणांसह आणि इंग्रजी किमान ५० गुणांसह (१० वी किंवा १२ वीला) उत्तीर्ण. वयोमर्यादा – १७ ते १९ वष्रे ६ महिने (उमेदवाराचा जन्म २ जुल १९९७ आणि १ जानेवारी २००० दरम्यानचा असावा.) उंची – १५७ सें.मी. फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत. वेतन – ७४,१०० रुपये दरमहा सीटीसी. निवड पद्धती – जेईई (मेन) किंवा बोर्डाच्या (१२ वीतील) गुणवत्तेनुसार समसमान उमेदवार एसएसबी मुलाखतीसाठी निवडले जातील. अंतिम निवड एसएसबीतील गुणांनुसार. प्रशिक्षण – ‘अ‍ॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन’ किंवा ‘मेकॅनिकल इंजिनीयरिंग’मधील बी.टेक्.साठी ४ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह किंवा इंजिनीअरिंग/आíकटेक्ट किंवा इलेक्ट्रिकल शाखा दिल्या जातील. कोर्स पूर्ण झाल्यावर बी.टेक्. पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिली जाईल. प्रशिक्षणाचा सर्व खर्च भारतीय नौसेना करेल. कॅडेट्सना कपडे आणि जेवण मोफत मिळेल. अर्ज कसा करावा – ई-अ‍ॅप्लिकेशन ऑनलाइन पद्धतीने http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरून १० जुल २०१६ पर्यंत करावा. अर्जाच्या दोन प्रतींची पिंट्र काढावी. यातून ऑनलाइन भरलेल्या अर्जाची एक प्रत सही करून आवश्यक त्या कागदपत्रांसोबत ‘पोस्ट बॉक्स नं. ०४, निर्माण भवन, नवी दिल्ली – ११००११’ या पत्त्यावर साध्या पोस्टाने २० जुल २०१६ पर्यंत पोहोचतील अशी पाठवावी.

मुंबई विद्यापीठ, प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमीमार्फत यूपीएससी/एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी चालविले जातात. जे विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षांना बसू इच्छितात अशांना प्रवेश पूर्व परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ६ ऑगस्ट २०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश पूर्व परीक्षा १३ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी १ वा. घेण्यात येईल. संपर्क – प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी, मुंबई विद्यापीठ, जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, रू.नं. ४, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०००९८. दूरध्वनी क्र. ०२२-२६५४३५४७/२६५३०२०८.

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायजर्स (आरसीएफ) कंपनीमध्ये बीएससी, १२ वी विज्ञान, अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांची अ‍ॅप्रेंटिस भरती. पदाचे नाव (पदसंख्या) – पात्रता तपशील पुढीलप्रमाणे (अ) ट्रेड अ‍ॅप्रेन्टिस केमिकल प्लांटसाठी (१) अटेंडंट ऑपरेटर (२८) बीएससी रसायनशास्त्र (व भौतिकशास्त्र दुय्यम विषयासह) किमान ५० गुण (२) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (०४) बीएससी भौतिकशास्त्र (व रसायनशास्त्र दुय्यम विषयासह) किमान ५० गुण (३) मेन्टेनन्स मेकॅनिक (०७) आणि (४) इलेक्ट्रिशिअन (०२) पात्रता (३) व (४) साठी १२ वी (विज्ञान / एमव्हीएस्सी) किमान ५५ गुणांसह उत्तीर्ण. (ब) डिप्लोमा ट्रेनी – (अ) केमिकल (१९), (ब) मेकॅनिकल (१८), (क) इलेक्ट्रिकल (१२), (ड) इन्स्ट्रमेन्टेशन (०८), (इ) सिव्हील (०३), (फ) कॉम्प्युटर (०२), (ग) मेडिकल लॅब टेक्निशिअन (०५) – पात्रता (अ) ते (फ) साठी संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका किमान ५० गुणांसह उत्तीर्ण. अजा / अज उमेदवारांना गुणांच्या टक्केवारीत ५ सूट. प्रशिक्षण कालावधी (१) अटेंडंट ऑपरेटर आणि (२) इन्स्ट्रमेंन्ट मेकॅनिकसाठी १ वर्ष ६ महिने विद्यावेतन दरमहा ६७९४ रुपये (पहिले वर्ष), ७६४४ रुपये (दुसरे वर्ष) (३) मेन्टेनन्स मेकॅनिक – ३ वष्रे विद्यावेतन दरमहा ५९४५ रुपये पहिले वर्ष, ६७९४ रुपये दुसरे वर्ष, ७६४४ रुपये तिसरे वर्ष. (४) इलेक्ट्रिशिअन – २ वष्रे – विद्यावेतन दरमहा ५९४५ रुपये पहिले वर्ष ६७९४ रुपये दुसरे वर्ष (ब) डिप्लोमा ट्रेनीसाठी १ वर्ष विद्यावेतन दरमहा ५००० रुपये, वयोमर्यादा १ मे २०१६ रोजी कमाल वय पद क्र. (३) व (४) साठी २१ वष्रे इतर पदांसाठी २५ वष्रे. अजा / अज व इमाव साठी वयात क्रमाने ५ वष्रे व ३ वष्रे सूट. निवड पद्धती – पात्र उमेदवारांची निवड त्यांच्या पदवी /१२ वी पदविका कोर्सच्या शेवटच्या वर्षांच्या किंवा शेवटच्या दोन सेमिस्टरच्या गुणांच्या टक्केवारीनुसार केली जाईल. अर्ज प्रक्रिया शुल्क – १०० रुपये/ -अजा/अज यांना अर्ज प्रक्रिया शुल्क माफ अर्ज कसा करावा कंपनीच्या http://www.rcfltd.com या संकेतस्थळावरील रिक्रुटमेंट सेक्शनवर क्लिक करून चलनाचे पिंट्र घेऊन एसबीआयच्या शाखेत जाऊन अर्जप्रक्रिया शुल्क जमा करावे. विहित नमुन्यातील अर्ज (कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध) मूळ चलनासह ‘मूळ व्यवस्थापक (मानव संपदा) – युनिट, रुम नं.४, तळ मजला, आर.सी.एफ.लि., प्रशासकीय भवन, चेंबूर, मुंबई – ४०००७४ या पत्त्यावर दिनांक १४ जुल, २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतील पाच रुग्णालयात सर्वसाधारण परिचर्या व प्रसविका अभ्यासक्रम याकरिता महिला उमेदवारांना प्रवेश. अभ्यासक्रम प्रशिक्षण दिनांक ०१ ऑक्टोबर २०१६ पासून सुरू होईल. कालावधी ३ वष्रे. प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन दरमहा १००-१०-१३० अधिक ३४० रुपये गणवेश भत्ता अधिक १५० रुपये धुलाई भत्ता, अधिक मोफत वसतीगृह निवास व मोफत जेवण. प्रवेशसंख्या एकूण ३५०. पात्रता – १२ वी (विज्ञान पीसीबी विषयांसह) किमान ४० गुणांसह उत्तीर्ण (मागासवर्गीयांसाठी ३५ गुण). पात्रताधारक उमेदवार न मिळाल्यास कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. वयोमर्यादा – दिनांक ३१ डिसेंबर २०१६ रोजी १७ ते ३५ वष्रे.
अर्ज कसा करावा – विहित अर्जाचे नमूने ‘रोखे विभाग, लो.टि.म.स. रुग्णालय, शीव, मुंबई – ४०००२२, यांच्या कार्यालयात प्रगत वर्गासाठी ३१६.५० रुपये (मागासवर्गीयांसाठी २११ रुपये ) रोख भरून कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी
११ ते ३ या वेळेत १६ जुल २०१६ पर्यंत वितरित केले जातील. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतिंसह परिचारिका शाळा, लो.टि.म.स. रुग्णालय, शीव, मुंबई – ४०००२२ या पत्त्यावर
२० जुल, २०१६ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत स्वत: किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे पाठवावेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो), सतीशधवन अंतरिक्ष केंद्र (शार), श्रीहरीकोटा (आंध्रप्रदेश), टेक्निशिअन-बी (४२ पदे) आणि फायरमन – ए (११ पदे) पदांची भरती टेक्निशिअन-बी मध्ये फिटरसाठी (१८ पदे) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी (८ पदे) इलेक्ट्रिकल (३ पदे), रेफ्रि आणि ए सी साठी (३ पदे) आणि इतर ट्रेडसाठी (१० पदे). पात्रता क्त टेक्निशिअन-बी साठी दहावी आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय / एनटीसी / एनएसी उत्तीर्ण. फायरमन पदासाठी (अ) १० वी उत्तीर्ण (ब) उंची १६५ सेमी, (क) वजन ५० किलो, (ड) छाती ८१-८६ सेमी, (इ) शारीरिक क्षमता चाचणी (१) १०० मीटर – १३ सेकंदात धावणे (२) उंच उडी – ५ फूट (३) लांब उडी- १७ फूट (४) गोळा फेक (७.२७ कि.ग्रॅ.)- २४ फूट (५) २२५ फूट दूरवर क्रिकेट बॉल फेकणे (६) हातांच्या सहाय्याने १४ फूट दोर चढणे (७) १० पूलअप्स (८) १५०० मीटर ५ मि.१५ सेकंदात धावणे. (उमेदवारांना यापकी कोणत्याही ५ स्पर्धाची निवड करता येईल.) अंतिम निवड – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार. स्कील टेस्ट मधील गुण गुणवत्तेसाठी पकडले जाणार नाहीत. अर्ज कसा करावा क्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने http://sdsc.shar.gov .in/ या संकेतस्थळावर दिनांक २१ जुल २०१६ पर्यंत करावा.