प्रादेशिक सेनेत अधिकारी पदाच्या संधी-

उमेदवार सैन्यदलातील निवृत्त अधिकारी व पदवी पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ४२ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली प्रादेशिक सेनेची जाहिरात पाहावी अथवा प्रादेशिक सेनेच्या http://www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल, टेरिटोरियल आर्मी, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स एल ब्लॉक, चर्च रोड, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१७.

*   दक्षिण- पश्चिम रेल्वेत हुबळी येथे कलाकारांसाठी संधी-

अर्जदार ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, कुठल्याही विषयातील पदवीधर किंवा शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत व त्यांनी व्हायोलीन व तबलावादन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.

वयोमर्यादा २९ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित  झालेली दक्षिण- पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा http://www.rrchubli.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज दी असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर रिक्रूटमेंट, रेल्वे रिक्रूटमेंट सेल, साउथ वेस्टर्न रेल्वे, दुसरा मजला, क्लब रोड, हुबळी ५८००२३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१७.

*   भारत कुकिंग कोल लिमिटेडमध्ये ज्युनिअर ओव्हरमन/ मायनिंग श्रीडार पदाच्या जागा-

अर्जदार मायनिंग इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत कुकिंग कोलची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या  http://www. bcclweb.in/? page_id=25545 या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१७.

*   भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत स्टेनोग्राफर्सच्या संधी-

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांना इंग्रजी आणि मराठीचे चांगले प्रभुत्व असायला हवे व ते लघुलेखनाची १०० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. संपूर्णपणे भरलेले अर्ज सचिव, भारती विद्यापीठ, पुणे, भारती विद्यापीठ भवन, लालबहादूर शास्त्री मार्ग, पुणे- ४११०३० येथे पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१७.

*   सैनिक शाळा, विजापूर येथे प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून संधी-

अर्जदारांनी जीवशास्त्र विषयासह बारावी अथवा बीएस्सी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० डिसेंबर २०१६ च्या अंकातील सैनिक शाळा, विजापूरची जाहिरात पाहावी अथवा सैनिक शाळेच्या http://www.ssbj.in// या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज प्राचार्य,

सैनिक शाळा, विजापूर ५८६१०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१७.

*   खादी व ग्रामीण उद्योग निगममध्ये मुंबई येथे डायरेक्टर (मीडिया आणि पब्लिसिटी) म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी खादी व ग्रामीण उद्योग निगमच्या http://www.kvic.org.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (अ‍ॅडमिन अ‍ॅण्ड एचआर), खादी अ‍ॅण्ड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन ३, इर्ला रोड, विलेपार्ले (प.), मुंबई ४०००५६

या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१७.