*  कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (नोटिफिकेशन नं. उड/ढ-फ/०२/२०१७) मध्ये सिव्हिल/इलेक्ट्रिकल/ इंजिनीअर्सची भरती.

१) ज्यु. इंजिनीअर/सिव्हिल (१३ पदे), २) ज्यु. इंजिनीअर/इलेक्ट्रिकल (२४ पदे).

पात्रता – संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदविका किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण. इलेक्ट्रिकल पदासाठी इलेक्ट्रॉनिक्समधील पदविकाधारक पात्र आहेत. अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वय दि. १ जुल २०१७ रोजी ३२ वष्रेपर्यंत (इमाव -३५ वष्रे, अजा/अज – ३७ वष्रे) प्रकल्पग्रस्तांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

परीक्षा शुल्क – रु. २००/- (अजा/अजसाठी फी माफ)

वेतन – रु. ३६,८१६/-  एचआरए आणि टीए भत्ता.

ऑनलाइन अर्ज http://www.konkanrailway.com <http://www.konkanrailway.com/&gt;  या संकेतस्थळावर दि. ११ मे २०१७  पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाच्या पिंट्रआउटवर पासपोर्ट साइज फोटो चिकटवून सही केलेले अर्ज अढड – Recruitment, Belapur Bhavan, Sec. 11, CBD, Belapur, Navi Mumbai – 400 614 या पत्त्यावर दि. १२ मे २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि., मुंबई येथे सिनियर इंजिनीअर मेकॅनिकच्या एकूण २६ पदांची भरती.

पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण.

अनुभव – फॅब्रिकेशन/प्रोडक्शन/ आउटफिटिंग/प्लािनग/डिझाइन/प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील एक वर्षांचा अनुभव. करार वाटाघाटी, व्यावसायिक काय्रे, साहित्य खरेदी यातील अनुभव असल्यास प्राधान्य.

जीएटीई २०१६/जीएटीई/ २०१७ मधील वैध स्कोअरवर आधरित अंतिम निवड.

ऑनलाइन अर्ज http://www.mazdock.com   या संकेतस्थळावर दि. ११ मे २०१७ पर्यंत करावेत.

*  महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘कृषी अधिकारी’च्या ७९ पदांच्या भरती

दि. ३० जुल २०१७ रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या केंद्रांवर महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा, २०१७ घेणार आहे.

रिक्त पदांची संख्या एकूण ७९ (अज -२१, विजा (अ) – २, भज (ब) – ११, अज (ड) – १, इमाव – ११, खुला – ३३).

पात्रता – कृषी/कृषी अभियांत्रिकी/उद्यानविद्या/कृषी जैव तंत्रज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/गृह विज्ञान/

फूड टेक्नॉलॉजी बीएफएस्सी पदवी उत्तीर्ण. अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

परीक्षेचे टप्पे – तीन (१) पूर्वपरीक्षा – २०० गुण (२) मुख्य परीक्षा – ४०० गुण (३) मुलाखत – ५० गुण.

परीक्षा शुल्क – रु. ३७३/- (अमागास), रु. २७३/- (मागासवर्गीय). वय – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी ३८ वष्रेपर्यंत (मागास ४३ वष्रे) ऑनलाइन अर्ज <https://mahampsc.mahaonline.gov.in/>  या संकेतस्थळावर

दि. २ मे २०१७ पर्यंत करावेत.