तुमचे आधार कार्ड आता सर्व व्यवहारांसाठी युनिव्हर्सल आयडी ठरणार आहे. भीम अॅपमध्ये १२ अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून व्यवहार करण्याची सुविधा आधार कार्ड धारकांना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन व्यवहारांसाठी एटीएम कार्डांची गरज भासणार नाही.

केंद्र सरकारने भीम अॅपमध्ये आधार कार्डचा पेमेंट आयडी म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये भीम अॅपमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आधार कार्ड पेमेंट आयडी झाल्यास अॅपमध्ये बायोमेट्रीक नोंदणी आणि बँकेच्या यूपीआय रजिस्ट्रेशनही करावे लागणार नाही.  आधार कार्ड क्रमांक टाकून व्यवहार करता यावे यासाठी यूआयडीएआय बँक आणि अन्य यंत्रणांशी चर्चा करत असून येत्या काही आठवड्यात ही सुविधा कार्यान्वित होईल असा दावा केला जात आहे.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार देशातील ३८ कोटी जनतेचे आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँकेशी जोडलेले आहेत. त्यामुळे या द्वारे व्यवहार करणे सहज शक्य होऊ शकते.  भीम अॅपवरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही ‘यूपीआय’सक्षम बँकेत खाते हवे असते. यूपीआय पिन मिळवण्यासाठी डेबिट कार्डाचा तपशील द्यावा लागतो आणि त्यामुळे गोरगरीब आणि अशिक्षित मंडळी वेळखाऊ प्रक्रियेमुळे या अॅपकडे पाठ फिरवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. ‘आधार’मुळे कामगारापासून कोणाच्याही बँक खात्यात पैसे जमा करणे शक्य होणार आहे. यासाठी त्या व्यक्तीकडे भीम अॅप नसले तरी चालेल, फक्त त्याचे बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गरजेचे असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. दर महिन्याला सुमारे २ कोटी लोकांचे आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडत आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये देशातील निम्या लोकांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी देखील आधार कार्डचे महत्त्व अधोरेखित केले होते.  नोटाबंदीनंतर रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी नीती आयोगाने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे २०२० पर्यंत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशीन्सची गरज उरणार नसल्याचे अमिताभ कांत यांनी म्हटले होते. येत्या काळात केवळ आधार अॅप किंवा भीम अॅपचा वापर करुन सर्व व्यवहार केले जातील असे संकेत त्यांनी दिले होते.