दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ‘आप’मध्ये स्थान कोणते, यावरून पक्षांतर्गत वाद सुरू आहे. त्याचबरोबर पक्षाच्या नेत्यांमध्ये संवाद व परस्पर विश्वासाचा अभाव असल्याचा ठपका अंतर्गत लोकपाल अ‍ॅडमिरल रामदास यांनी ठेवला आहे. तसेच एक व्यक्ती एक पद अशी व्यवस्था पक्षात हवी असे सुचवले आहे. त्यावरून पक्षात दोन तट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
रामदास यांनी पक्षातील अंतर्गत लोकशाहीबाबतचे पत्र राजकीय व्यवहार समितीला पाठवले आहे. त्यातील मसुद्यावरून पक्षात वाद निर्माण झाला आहे. पक्षातील अंतर्गत लोकशाहीवर होणाऱ्या टीकेबाबत स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून जबाबदारी कशी हाताळणार, याबाबत स्पष्टीकरण गरजेचे असल्याचे रामदास यांनी स्पष्ट केले आहे. ‘आप’ने केवळ दिल्लीपुरतेच मर्यादित राहू नये, तर जनतेच्या अपेक्षा पाहता व्यापक दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षाही रामदास यांनी व्यक्त केली आहे.