उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षातील अंतर्गत धुसफूस रोज नवे वळण घेत असतानाच आता पोस्टरच्या माध्यमातूनही एकमेकांविरोधात चिखलफेक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव विरुद्ध काका शिवपाल यादव यांच्यातील कलगीतुऱ्यांमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच या वादाला अमरसिंह जबाबदार असल्याची चर्चा रंगल्यानंतर अखिलेश यादव यांच्या गटातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर जळजळीत प्रहार करण्यात आला आहे.
लखनऊमध्ये लावण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये कुत्र्यांच्या डोक्यावर अमरसिंह यांचे छायाचित्र लावण्यात आले असून, त्यांच्याबद्दल अपशब्दही लिहिण्यात आले आहेत. अमरसिंह हे घरामध्ये बेबनाव निर्माण करण्यात कुशल आहेत, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अनिल यादव आणि विनीतकुमार कुशवाहा यांनी सुलतानपूर रस्त्यावर हे पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनले आहे.
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरसिंह यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. यादव कुटुंबात सुरू असलेल्या वादाला अमरसिंहच जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केली. पक्ष फुटण्यापूर्वीच मुलायमसिंह यादव यांनी पक्षाला सावरण्याची गरज व्यक्त करत अखिलेश यादव यांची त्यांनी बाजूही घेतली. अखिलेश यांच्या नेतृत्वाखालीच समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळू शकते, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
पक्षाला दुभंगण्यापासून वाचवण्यासाठी मी मुलायमसिंहाना विनंती करतो. अखिलेश यादव हे पक्षाचे अत्यंत योग्य नेतृत्व करत आहेत. ते फक्त कोणाचे ऐकत नाही. मुलायमसिंह यांनी एकदा पक्षांतर्गत मतदान घेऊन अमरसिंहांबाबत मत आजमावून पाहावे, असे म्हणत खूशमस्कऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
मुलायमसिंह यादव हे महान नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार झाला आहे. त्यांच्याशिवाय समाजवादी पक्ष होऊच शकत नाही. परंतु, एका व्यक्तीने पक्षात फूट पाडण्याचे ठरवल्यानंतरही मुलायमसिंह यांनी मौन धारण केले आहे, अशी खंत व्यक्त केली. अमरसिंह यांचे नाव न घेता ते म्हणाले, एका व्यक्तीने नोव्हेंबर महिन्यातच टविट करत अखिलेश हे मुख्यमंत्री पदावर दीर्घकाळ राहणार नसल्याचे म्हटले होते. म्हणजे अनेक दिवसांपासून हा कट रचण्यात आला होता. परंतु मुलायमसिंहांना ही गोष्ट समजली नाही.

Mallikarjun Kharge interview Congress loksabha elections 2024 PM Narendra Modi BJP
इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा
Central Institute of Fisheries Education Mumbai recruitment 2024
CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पाहा अधिक माहिती
kolhapur, Two Arrested in scam, India Makers Agro Scam, Rs 2 Crore Assets Seized, shridhar khedekar, suresh junnare, lure, crore scam, police, scam news, kolhapur news, marathi news,
कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक
gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा