तपासादरम्यान पुढे आलेले सत्य उघड करण्यामुळे कोणत्याही तपास यंत्रणेसमोर कधीही अडचणी निर्माण होत नाहीत़  उलट यंत्रणांनी सर्व गोष्टी उघड करून लोकांची मने जिंकली पाहिजेत, असे मत माजी दक्षता आयुक्त आऱ श्रीकुमार यांनी व्यक्त केल़े  तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्यात यावा, असाही सल्ला त्यांनी दिला़
सीबीआयला माहिती अधिकारातून थेट केंद्र शासनानेच वगळले आहे, परंतु सीबीआय ही सार्वजनिक संस्था आह़े  त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारापासून लपणे सोडून दिले पाहिजे आणि जनतेच्या समीक्षणासाठी स्वत:कडील माहिती उघड केली पाहिजे, असे श्रीकुमार यांनी सांगितल़े  पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी सीबीआयच्या गुप्ततेवर टीका केली होती़  त्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीकुमार यांनीही सीबीआयच्या बंद दरवाजाच्या कारभारावर टीका केली आह़े  थोडय़ाच कालावधीसाठी सीबीआय माहिती अधिकाराच्या कक्षेत होत़े  त्या काळात काही आभाळ कोसळले नाही़  परंतु अपारदर्शकता, गुप्तता आणि गूढता यांच्या वेष्टनात गुंडाळलेले असल्यामुळे सीबीआयला पुन्हा माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल़े  हे मोठे दुर्दैव आह़े  सीबीआय ही भ्रष्टाचार आणि काही फौजदारी गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणा आह़े  ती सुरक्षा किंवा गुप्तहेर यांच्याशी संबंधित यंत्रणा नाही, असेही श्रीकुमार म्हणाल़े  येथील सीबीआयच्याच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडल़े