नागपूरच्या एका कंपनीच्या विरोधात कोळसा खाण घोटाळा  (कोलगेट) प्रकरणात नव्याने एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण २००३ मध्ये एनडीएच्या राजवटीत घडलेले आहे. सीबीआय सूत्रांनी सांगितले की, गुन्हेगारी कट व फसवणुकीचा गुन्हा या प्रकरणी गोंडवाना इस्पात लिमिटेड कंपनीविरुद्ध व त्यांचे प्रवर्तक, संचालक अशोक डागा यांच्याविरुद्ध सत्यापलापाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरा येथील कोळसा खाण वाटपाच्या वेळी नोंदणी करताना कंपनीने खाण मिळवण्यासाठी सरकारला खोटी माहिती दिली होती. कोळसा खाण विकसित न करताच कंपनीने समभाग निकाली काढले व त्यांचा उपयोग हव्या त्या उद्देशासाठी केला नाही. सीबीआयने कोळसा खाणी घोटाळा प्रकरणात २८ वा एफआयआर नोंदवला आहे.