चीनने यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान ३९१८ बेकायदा वेबसाइट बंद केल्या आहेत. सरकारच्या अधिकृत माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. सायबरस्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायनाकडून (सीएस) जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार ज्या वेबसाइटवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे देशाचे नुकसान होत होते. देशात हिंसा आणि अफवा पसरवण्याचे काम या वेबसाइट करत होत्या.

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या कालावधीत ३१६ प्रकरणे न्यायालयीन विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. या वर्षी दुसऱ्या तिमाहीत ८ लाख १० हजार बेकायदा सायबर अकाऊंट बंद करण्यात आल्याची माहिती सीएसीने दिली आहे.

त्याचबरोबर कायद्याचे भंग केल्याप्रकरणी ४४३ वेबसाइटला समन्स पाठवण्यात आले आहे. तर १७२ वेबसाइटला इशारा देण्यात आला आहे.