पाकिस्तानातील संसदेचा पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यामुळे पाकमध्ये येत्या १६ मेपर्यंत सार्वत्रिक निडणुका घेण्यात येणार आहेत.  माहितीमंत्री कुरमान झामन कैरा यांनी रविवारी ही घोषणा केली़ निवडणूक सुधारणांची मागणी करणाऱ्या ताहीर उल काद्री यांच्याशी  झालेल्या बैठकीनंतर कैरा यांनी ही घोषणा केली़  मतदारयादीत नाव नोंदविण्याचे दिवस ३० वरून १४ पर्यंत कमी करण्यास काद्री यांनी संमती दिली असल्याचेही कैरो यांनी सांगितल़े