हैदराबाद पोलिसांनी आयसिसशी संबंधित एका युवकाला अटक केली आहे. आयसिसशी संबंधित लोकांबरोबर तो फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे वय २२ असून हैदराबादच्या भारत नगर परिसरातून त्याला अटक करण्यात आली. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून त्याच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.