दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी)चा निकाल ६ मे रोजी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ दिवस आधी हा निकाल लागणार आहे. आज दुपारी ३ वाजल्यापासून cisce.org, cisce.org/results आणि careers.cisce.org to या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना ICSE Result निकाल पाहता येईल.  शिवाय एसएमएसद्वारेही निकाल मिळेल.
द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट इक्झामिनेशन अंतर्गत दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. यंदा दहावीची परीक्षा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च तर बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या कालावधीत पार पडली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. तर यंदा तब्बल १२ दिवस आधी निकाल लागणार आहे.