परदेशात नोकरी मिळवावी आणि तिथेच स्थिरस्थावर व्हावे, असे स्वप्न भारतातील अनेक तरुण पाहतात. मात्र अशा तरुणांच्या संख्येत वेगाने घट होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतीय तरुणांच्या मनात परदेशांबद्दल असणारे आकर्षण वेगाने कमी झाल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परदेशांमधील राजकीय अस्थिरतेमुळे उच्च कौशल्य असलेले तरुण भारतातच नोकरी करु इच्छित आहेत. जागतिक स्तरावर रोजगाराबद्दलची माहिती देणाऱ्या ‘इंडिड’ या संकेतस्थळावरील आकडेवारीच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे.

सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकरीसाठी अमेरिकेला जाणाऱ्या भारतीय तरुणांच्या प्रमाणात ३८ टक्क्यांनी घट झाली आहे. तर ब्रिटनमध्ये जाणाऱ्या भारतीयांची संख्या ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. ‘ब्रेक्झिटमुळे भारतीय तरुण नोकरीसाठी ब्रिटनला जाण्यात फारसे उत्सुक नाहीत,’ असे सर्वेक्षण सांगते. मात्र जर्मनी आणि आयर्लंडला नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांचे प्रमाण वाढले आहे. रोजगारासाठी जर्मनीला जाणाऱ्या भारतीयांच्या प्रमाणात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर नोकरीसाठी आयर्लंडला जाणाऱ्या भारतीय तरुणांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. आखाती देशांमध्ये नोकरी करण्यात भारतीय तरुणांना आता फारसा रस राहिलेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत आखाती देशात जाणाऱ्या भारतीय तरुणांची संख्या २१ टक्क्यांनी घटली आहे.

Rahul Gandhi Attacks PM Modi
मोदींना फक्त श्रीमंतांची चिंता; राहुल गांधी यांचा आरोप
Amit shah on ucc
“देश शरियावर चालवायचा का?” UCC ला विरोध करणाऱ्यांना अमित शाहांचा थेट प्रश्न, म्हणाले, “अनेक मुस्लिम देश…”
BJP invited global parties
“भारतात या, बघा आम्ही कसे जिंकतो?”; परदेशातील तब्बल २५ पक्षांच्या प्रतिनिधींना भाजपाने दिले निमंत्रण! दाखविणार ‘लोकशाहीचा सोहळा’
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप

वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था आणि परदेशांमधील राजकीय अस्थिरता यांच्यामुळे उच्च कौशल्य असलेले भारतीय तरुण मायदेशातच रोजगाराच्या संधी शोधत असल्याचे ‘इंडिड’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘ब्रिटनमध्ये गेलेल्या २५ टक्के लोकांना भारतात नोकरी हवी आहे. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनाही माघारी परतायचे आहे. या भागातून रोजगारासाठी भारतात परतण्याची इच्छा असलेल्या तरुणांची संख्या तब्बल १७० टक्क्यांनी वाढली आहे,’ अशी माहिती ‘इंडिड इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक शशी कुमार यांनी दिली.

परदेशात जाण्याची भारतीय तरुणांची इच्छा कमी झाली असली तरी आजही तरुणांची सर्वाधिक पसंती अमेरिकेला आहे. भारतातील ४९ टक्के तरुणांनी नोकरीसाठी अमेरिकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर संयुक्त अरब अमिराती (१६ टक्के), कॅनडा (९ टक्के), ब्रिटन (५ टक्के), सिंगापूर (४ टक्के), ऑस्ट्रेलिया (३ टक्के), कतार (२ टक्के), दक्षिण आफ्रिका आणि बहारिन (प्रत्येकी १ टक्का) या देशांचा क्रमांक लागतो.