पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदरातिथ्यासाठी शनिवारी शांघायमध्ये खास मेजवानीचा बेत आखण्यात आला होता. सत्ताधारी पक्षाचे सचिव हान झेंग यांच्याकडून देण्यात आलेल्या या मेजवानीसाठी फक्त शाकाहारी खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. मोदी शाकाहारी असल्यामुळे ही काळजी घेण्यात आली होती.
या मेजवानीत डबल बॉईल्ड बीन कर्ड सुप, स्ट्युड पोर्किनी, साऊटेड अॅस्पारगस अँड लोटस सीड अशा शाकाहारी खाद्यपर्थांचा समावेश होता. परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी मोदींच्या मेजवानीचे मेन्युकार्ड ट्विटरवर शेअर केले. या मेजवानीत डेझर्ट म्हणून चिल्ड मँगो सागो क्रीम विथ फ्रेशस फ्रुटस हा खास पदार्थही होता. यापूर्वी मोदींच्या चीन दौऱ्याच्या पहिल्या दिवशीही झियान येथे आयोजित करण्यात आलेल्या मेजवानी समारंभातही फक्त शाकाहारी पदार्थांचा समावेश होता.