दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन वेगळ्या पत्त्यांवर दोन मतदार ओळखपत्रे असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशीला सुरुवात केली आहे. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्ष व काँग्रेसने केली आहे.  बेदी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बेदी यांच्याकडे उदय पार्क व तालकोटरा मार्ग अशा दोन पत्त्यांवर ओळखपत्रे आहेत. नियमानुसार दोन ओळखपत्रे हा कायद्याचा भंग आहे. तालकोटरा मार्ग येथील पत्ता असलेले ओळखपत्र रद्द करण्यासाठी बेदी यांनी अर्ज केला होता काय, याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली निवडणुकीसाठी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार नाही, त्या ऐवजी दृष्टिपत्र (व्हिजन डॉक्युमेंट) येत्या प्रकाशित करणार आहे.

भाजपचा जाहीरनामा नाही
दिल्ली निवडणुकीसाठी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार नाही, त्या ऐवजी दृष्टिपत्र (व्हिजन डॉक्युमेंट) येत्या एक-दोन दिवसांत प्रकाशित करणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान अरविंद केजरीवाल यांना भाजप रोज पाच प्रश्न विचारणार आहे.