केंद्र सरकारच्या उत्पन्न घोषणा योजनेअंतर्गत तब्बल १३,८६० कोटींचे अघोषित रक्कम जाहीर करणाऱ्या महेश शाहची आयकर विभागाकडून चौकशी झाली आहे. या चौकशीत महेश शाहने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. १३,८६० कोटी रुपयांपैकी एकही रुपया आपला नसल्याचे महेश शहा याने चौकशीत सांगितले आहे. यानंतर महेश शहाला सोडण्यात आले. सोमवारी ११ वाजता पुन्हा महेश शहाची चौकशी होणार आहे. अनेक बड्या माशांची नावे आपण उघड करणार असल्याचे महेश शाहने चौकशी दरम्यान सांगितले.

महेश शहा त्याच्याकडे असणाऱ्या रकमेचा तपशील देऊन फरार झाला होता. मात्र तो शनिवारी तो अचानक एका टिव्ही चॅनेलवरील चर्चेत सहभागी झाला. याच चर्चेतून महेश शहाला ताब्यात घेण्यात आले. अहमदाबादमध्ये परतलेल्या महेश शहाने आपण घोषित केलेल्या रकमेचा तपशील योग्य असल्याचे सांगितले. ‘मी जाहीर केलेला तपशील योग्य आहे. मात्र तो तपशील माझ्याकडे असणाऱ्या रकमेचा नाही. हे पैसे कोणा एका व्यक्तीचे नाहीत. हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या अनेकांचे आहे. हा पैसा महाराष्ट्र किंवा गोव्यातील एखाद्या बांधकाम व्यावसायिक किंवा नेत्याचा नाही. हा पैसा संपूर्ण देशातून आलेला आहे. मी फक्त एक प्यादे आहे. मला या रकमेच्या घोषणात कमिशन मिळणार होते,’ असे महेश शहाने म्हटले आहे.

सरखेड पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याआधी शाहने एका स्थानिक टिव्ही चॅनेलसोबत बातचीत केली. याच ठिकाणाहून आयकर विभागाने महेश शहाला अटक केली. मी सर्व खुलासे करण्यास तयार आहे, असे शाह याने म्हटले. शाहने यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची टिम मागितली आहे. ‘मला पळून जाण्यास भाग पाडण्यात आले. मी पहिल्यांदा दंडाची रक्कम भरल्यानंतर परिस्थिती बदलली. माझ्या पत्नीला आणि मुलाला त्रास दिला जात होता. ते निर्दोष आहेत. त्यांना त्रास दिला जाऊ नये, म्हणून मी परत आलो,’ असे शाहने म्हटले आहे.

[jwplayer omVHXQSf]

‘मी १३,६८० कोटी रुपयांपैकी ६,२३७ कोटी रुपये म्हणजेच ४५% रक्कम कर रुपात देणार होतो. मात्र ज्यावेळी १,५६० कोटी रुपयांचा पहिला हफ्ता भरल्यानंतर मला ३० नोव्हेंबरला दुसरा हफ्ता भरता आला नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कलम १९३ च्या अंतर्गत माझा अर्ज क्रमांक २ रद्द केला,’ असे महेश शाहने सांगितले आहे.

[jwplayer fP93lvtp]