देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जपानच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारत आणि जपान यांच्यामधील संबंध दृढ होण्यासाटी मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अशाप्रकारचा सन्मान प्राप्त करणारे डॉ. मनमोहन सिंग हे पहिले भारतीय ठरणार आहेत.
‘द ग्रँड कॉरडॉन ऑफ द ऑर्डर ऑफ पाऊनोमनिआ’ हा जपानचा सर्वोच्च सन्मान आहे. जपान आणि भारतातील मैत्रीचे संबंध वृद्धींगत करण्याचे गेल्या ३५ वर्षांचे मनमोहन सिंग यांच्या अथक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याचे जपानच्या दूतावासाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जपान सरकार आणि तेथील जनतेचे प्रेम तसेच आपुलकीने आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. तसेच भारत आणि जपान यांच्या दरम्यान संबंध अधिक दृढ व्हावेत हे आपले उद्दीष्ट होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत या उद्दीष्टाच्या दृष्टीने यशस्वीरित्या कार्य केल्याचेही मनमोहन सिंग म्हणाले.

BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Threats from leaders of India Alliance Allegation of Prime Minister Narendra Modi
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून धमक्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान