येथील पीली चौकी भागात तीन जणांनी एका २७ वर्षांच्या विवाहित महिलेवर  सामूहिक बलात्कार करून तिच्यावर अ‍ॅसिड फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिजनोर बस स्थानकावर या महिलेने तिघांकडे लिफ्ट मागितली होती व ८ मार्चला म्हणजे ‘महिला दिनी’ हा प्रकार घडला असे प्राथमिक माहिती अहवालात म्हटले आहे. तिघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला व नंतर तिच्यावर अ‍ॅसिड फेकले व रस्त्याच्या कडेला फेकून दिले.
प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींना पकडण्यात येईल, असे बिजनोर शहर पोलीस स्टेशनचे अजय गौतम यांनी सांगितले. याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, पण गुन्हेगारांना पकडले जाईल असे सांगण्यात आले.