भारतात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून वाद सुरु आहेत. जेएनयूमध्ये  देण्यात आलेल्या देशद्रोही घोषणांच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि शिखर धवन यांनी आपले मत मांडले होते. यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेदेखील या वादात उडी घेतली आहे. सीमेवर आपले सैन्य आपली सेवा करत असल्यानेच आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित असल्याचे, मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले आहे.
धोनीने आज सकाळी ट्विट करत म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपण चर्चा करत आहोत. मात्र लष्कराचे जवान सीमेवर आपल्यासाठी पाहारा देत आहेत आणि त्याचमुळे आपण अशा चर्चा करू शकत आहोत. विशेष सैन्य आणि कमांडो आपल्यासारखेच सामान्य नागरिक असतात. पण, त्यांच्यामध्ये देशभक्ती प्रचंड असते. ते स्वतः आगोदर देशाचा विचार करतात. त्यांच्या सुरक्षेमुळेच आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे.