‘मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका..’ पठ्ठे बापूराव यांनी केलेले या मायानगरीचे वर्णन. मुंबई नगरीची भुरळ अनेकांना आहे. हे शहर कुणाला उपाशी ठेवत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा या शहराने पूर्ण केल्या. आता या स्वप्ननगरीची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. राहण्यासाठी आणि रोजगारासाठी हे जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे, असा निर्वाळा एका जागतिक संघटनेने सव्‍‌र्हेक्षणाअंती दिला आहे.
‘इन्सिड’ या संघटनेने निवारा व रोजगारासाठी सर्वोत्तम असलेल्या १५ शहरांची यादी तयार केली असून दुबई या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. मुंबईचा क्रमांक या यादीत १३वा असून, लंडन १०व्या, तर पॅरिस ११व्या क्रमांकावर आहे. या यादीत मुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे.

सर्वोत्तम शहरे
दुबई, अ‍ॅमस्टरडॅम, टोरँटो, सिंगापूर, माद्रिद, हाँककाँग, न्यूयॉर्क, टोकियो, शांघाय, लंडन, पॅरिस, मिलानो, मुंबई, मॉस्को, साओ पॉलो.

mumbai municipal corporation trees marathi news
मुंबईतील २२ हजार झाडांची छाटणी पूर्ण, ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटीस बजावली
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
mumbai gujarati language board marathi news
मुंबई: स्वा. सावरकर उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक, संस्थेला महापालिकेची नोटीस