25 May 2016

कुठे गेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दान मिळालेली करोडोंची संपत्ती?

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनातील रहस्य ६८ वर्षानंतरही उलघडू शकलेले नाही.

नवी दिल्ली | January 23, 2013 5:18 AM

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनातील रहस्य ६८ वर्षानंतरही उलघडू शकलेले नाही. इतकेच नाही तर स्वातंत्र्यलढ्यासाठी परदेशात वास्तव्याला असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून सुभाषचंद्र बोस यांना मिळालेली करोडो रुपयांची संपत्ती याचाही काही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८५७ रोजी झाला. १८ आँगस्ट १९४५ रोजी ताइवानच्या वायुसीमेत एका विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते, परंतु त्याबाबतही अनेक विरोधाभास व्यक्त करण्यात येत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनपटावर पुस्तक लिहीणारे लेखक अनुज धर यांच्या मते फक्त नेताजींचीचं नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्यासाठी विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांनी दिलेल्या करोडोंची संपत्ती कुठे गेली याचीही नोंद नाही. ‘इंडीयाज बिगेस्ट कवर अप’ या धर यांच्या पुस्तकात त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना मिळालेली संपत्ती देशातील काही बड्या लोकांनी लाटल्याचा आरोप केला आहे.   

First Published on January 23, 2013 5:18 am

Web Title: netaji subhash chandra bose