आपल्या आकाशगंगेतील तारे १० अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आले असले तरी सूर्याचा जन्म मात्र त्या  ‘बेबी बूम’ मध्ये झाला नाही तर सूर्याचा जन्म ५ अब्ज वर्षांपूर्वी झाला असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे, ज्याअर्थी सूर्य उशिरा जन्माला आला त्याअर्थी तो आधी जन्मलेल्या ताऱ्यांनंतर मरणार हे उघड आहे त्यामुळे पृथ्वीवर जास्त काळ जीवसृष्टी टिकून राहील. अनेक वेधशाळांच्या माध्यमातून दीर्घिकांची गणनाही करण्यात आली त्यात ही बाब पुढे आली आहे.
बेबी बूम पार्टीत सूर्याचा जन्म झाला नाही हे खरे असले तरी त्यामुळे सूर्यावर काही परिणाम झालेला नाही उलट त्यामुळे सौरमालेतील ग्रहांची निर्मिती होण्यास मदतच झाली आहे. हायड्रोजन व हेलियमपेक्षा जड मूलद्रव्ये बेबी बूमनंतर जन्मलेल्या सूर्यासारख्या ताऱ्यात भरपूर आहेत.  
दीर्घिकांच्या गणनेचे चित्र अजून स्पष्ट नाही. १० अब्ज वर्षांंपूर्वी सर्पिलाकार दीर्घिका कशा निर्माण झाल्या हे एक कोडे आहे. अतिनील व अवरक्त प्रकाशाचा बहुतरंगलांबीच्या मदतीने अभ्यास करण्यात आला त्यात नासाची स्पिटझर व हबल या दुर्बिणींचा व युरोपी स्पेस एजन्सीच्या हर्शेल वेधशाळेचा तसेच चिलीतील मेगॅलन बड्डा दुर्बिणीचा मोठा वाटा होता.  
खगोलवैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीची कहाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांनी विश्वातील याच वस्तुमानाच्या इतर दीर्घिकांचा अभ्यास केला. त्यांना असे दिसून आले की, ताऱ्यांचा अनेक वर्षांपूर्वी निघालेला प्रकाश अनेक वर्षांनी पृथ्वीवर येत असतो. वैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेसारख्या दोन हजार दीर्घिकांच्या प्रतिमांचा अभ्यास केला.
टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीचे कॅसे पापोविच यांनी सांगितले की, पूर्वी आकाशगंगा कशी दिसत असावी याचे अनुमान काढता येते. आपल्या आकाशगंगेसारख्या इतर दीर्घिकांमध्ये १० अब्ज वर्षांत बरेच बदल झालेले आहेत त्यांचे वस्तुमान बदलले आहे व ते १० पट झाले आहे. तारकीय वस्तुमानाची वाढ जन्मानंतरच्या पहिल्या अब्ज वर्षांत झालेली आहे.
 हा शोधनिबंध ९ एप्रिलच्या अ‍ॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आपल्या आकाशगंगेसारख्या दीर्घिका या ताऱ्यांच्या छोटय़ा पुंजातून जन्मल्या व काही दीíघका (गॅलेक्सीज) ताऱ्यांच्या जन्मावेळी निर्माण होणारे वायूचे गोळे गिळून जन्मल्या. ताऱ्यांच्या निर्मितीचा हा कारखाना नंतर थंडावला, दीर्घिकांची वाढही मंदावली. आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग व ताऱ्यांची संख्या यांचा अंदाज घेतला तर त्याचा संबंध आपल्या आकाशगंगेच्या वाढलेल्या वस्तुमानाशी लावता येतो. याचा अर्थ आपण आकाशगंगेइतके वस्तुमान असलेल्या दीर्घिकांच्या जन्मावेळी त्यांच्या वस्तुमानात किती वाढ झाली असावी याचा अभ्यास करू शकतो असे पापोविच यांनी सांगितले.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?