देशात विजेचा तुटवडा असतानाच विजेची बिले थकवण्यात पाकिस्तान सरकार पुढे असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट करीत सरकारलाच घरचा अहेर दिला आहे. वीज चोरी आणि बिलांची थकबाकी याच्या परिणामी देशात तब्बल १२ तासांचे भारनियमन होत आहे.
स्वत: सरकारच विजेचे बिल भरत नसल्यामुळे अनेक सरकारी इमारतींसह राष्ट्रपती भवन, पंतप्रधान सचिवालय, पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीशांचे सरकारी निवासस्थान आदींची वीजदेयके न भरल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता, असे पाणी आणि ऊर्जामंत्री ख्वाजा असिफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वातानुकूलित यंत्रांचा वापर मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे या आठवडय़ात ३२०० मेगा व्ॉट विजेचा तुटवडा निर्माण झाला होता. विजेच्या तुडवडय़ामुळे देशातील औद्योगिक उत्पादनांवरही परिणाम झाल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.