18 August 2017

News Flash

रामनाथ कोविंद यांच्या निवडीमागे आगामी लोकसभा निवडणुकीचे कनेक्शन?

कोविंद हे भाजपचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात

नवी दिल्ली | Updated: June 19, 2017 3:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा

भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा दिग्गज नेत्यांना बाजूला सारत मोदी- शहा जोडीने कोविंद यांच्यावर विश्वास दाखवला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह देशभरातील दलित मतदार भाजपसोबत राहावा यासाठी मोदी- शहा जोडीने हा निर्णय घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

१९९१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणारे रामनाथ कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. योगी आदित्यनाथांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना मोदी- शहा जोडीने ज्या धक्कातंत्राचा वापर केला तीच पद्धत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही दिसून आली. भाजपकडून कोणाला उमेदवारी देणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. पण या नावांना बगल देत मोदी- शहा यांनी रामनाथ कोविंद यांची निवड केली.

रामनाथ कोविंद हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, त्यांचा जन्म कानपूरमध्ये झाला. कोविंद हे दलित समाजातून येतात. अमित शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये वारंवार कोविंद यांच्या दलित समाजातून येण्याचा आणि मागासवर्गीयांसाठी लढा दिल्याचा उल्लेख केला. यातून भाजपने कोविंद यांची निवड का केली हे स्पष्ट होते. या संदर्भात ‘लोकसत्ता’चे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी संतोष कुलकर्णी म्हणाले, उत्तर प्रदेश आणि देशभरातील दलित मतदार हे भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. २०१४ प्रमाणेच २०१९ मध्येही उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळणे गरजेचे आहे . यासाठी भाजपला दलित मतदारांची साथ मिळण्याची आवश्यकता आहे. दलित व्होटबँक असलेल्या बसपला हादरा देण्यासाठी भाजपने कोविंद यांचा आधार घेतल्याचे दिसते. दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने कोविंद यांची निवड केली.

विनय सहस्त्रबुद्धे यांच्याप्रमाणेत कोविंद हे भाजपचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. कोविंद यांचा भाजपच्या ‘थिंक टँक’मध्ये समावेश होतो. राष्ट्रपतीपदावर मर्जीतील व्यक्तीला बसवण्याची मोदी- शहा जोडीचा प्रयत्न होता. आपले म्हणणे ऐकणारा आणि भविष्यात सरकारच्या कामात अडथळे आणणारा राष्ट्रपती नको अशी त्यांची भूमिका होती. त्यादृष्टीनेही कोविंद हे मोदी- शहांसाठी विश्वासपात्र ठरले आहेत.

First Published on June 19, 2017 3:32 pm

Web Title: presidential election 2017 why bjp narendra modi amit shah selected bihar governor ram nath kovind for president post
 1. R
  Ramdas Bhamare
  Jun 19, 2017 at 7:54 pm
  नाटकीपणाला दाद देणे हे मीडियाचे प्रमुख काम झाले आहे .
  Reply
 2. S
  Shivram Vaidya
  Jun 19, 2017 at 6:54 pm
  श्री. रामनाथ कोविंद यांच्यासारख्या बुद्धीमान पण प्रसिद्धीपराड्मुख व्यक्तिला निवडून भाजप एनडीए ने योग्य निर्णय घेतला आहे. अर्थात त्यांचा दलित म्हणून झालेला उल्लेख योग्य नाही ह्याचे भान प्रसिद्धीमाध्यमांनी ठेवायला हवे होते. राष्ट्रपतीपदावरील व्यक्तिला (तरी) जातीपासून वेगळे ठेवले पाहिजे. श्री. रामनाथ कोविंद भाजपशी किंवा रा स्व संघाशी संबंधित असले तरी आपल्या देशात तो काही दखलपात्र गुन्हा (अजून तरी) नाही. सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या नावाला विरोध न करता त्यांना एकमताने आणि सन्मानाने निवडून द्यावे.
  Reply
 3. N
  Nitin Deolekar
  Jun 19, 2017 at 5:58 pm
  दलित आम-बॅड-कर सायबाच्या गंभीर घोड-चुकीमुळे भारतात हिंदूची वाट लागली?? ढोन्गि सेक्युलर घटना समितीला साधा समान नागरी कायदा सुद्धा करता आला नाही?? बुध आमयेडकर सायबाने गरीब हिंदूना 1-पत्नी कायदा लादला? हिंदू बायका पोतगी साठी न्यायालयात भांडत बसतात! पण मुस्लिम मात्र मोकाट सोडले! 4-शादी तोंडी तलाक! त्यामुळे मुस्लिम लोकसंख्या 50 जास्त वेगाने वाढते आहे!! याला गंडी-नारू-आम-बॅड-कर यांचे चुकीचे सेक्युलर कायदे दोषी आहेत? आता पुढील ७० वर्षे नेहरू-आंबेडकरचे चुकीचे कायदे उलटे करा! हिंदूंना २-शादी लेखी तलाक!! आणि मुस्लिम बांधवांना समाजवादी चीन चा कुटुंब कायदा लावा!! १-कुटुंब-१-मूल पुढील फक्त ७० वर्षे नंतर २ चालतील !! यातूनच मुस्लिम बांधवांची खरी प्रगती आणि भरभराट होईल आणि आयसिस अतिरेकी आपोआप -च कमी होतील. बदल्यात मुस्लिम महिलांना शाळेत सानिया कडून टेनिस शिकवा !! त्यांना बीसी कोट्यात आरक्षण द्या! पुढारी बनलेल्या आंयेडकर जातील आता आरक्षणाची माती खाण्याची काय गरज?? त्यांना फार तर OBC त टाका..? दलितांचे अति कवतुक नको..!!
  Reply
 4. Y
  Yogesh
  Jun 19, 2017 at 5:08 pm
  म्हणजे सांगकाम्या राष्ट्रपतींची गरज होती आपला देश राष्ट्रपती वर एवढा खर्च करतो तरी कशाला जर आशा पदावर बसणाऱ्या व्यक्ती जी हुजूर टाईपचा असतात तर ... आणि लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना मंत्रिपद नाहीत ..जेटली , प्रभू सारखे निवडून न येत जी हुजूर बोलून महत्वाची खाती सांभाळतात मग या निवडणूक कशाला पाहिजेत ..
  Reply