26 September 2017

News Flash

भाजप-पीडीपी युती करून मोदींनी दहशतवाद्यांना मोकळे रान दिले- राहुल गांधी

पीडीपी व भाजप युतीमुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मोकळा वाव मिळाला.

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: September 13, 2017 3:59 AM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडीपी व भाजप यांची युती करून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना वाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ दिली त्यामुळे तेथे हिंसाचार वाढला आहे असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केला.

बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ‘मोदी यांनी भाजप व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) यांची जी युती केली ती मोठी चूक होती. पीडीपीने काश्मीरमधील तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणण्याचे प्रयत्न केले त्यात त्यांना यशही येत होते, पण ज्या दिवशी मोदी यांनी भाजप व पीडीपी यांची युती घडवून आणली त्यावेळी पीडीपीच्या तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणणारा पक्ष म्हणून स्थान संपुष्टात आले.’

‘पीडीपी व भाजप युतीमुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मोकळा वाव मिळाला. नंतर हिंसाचारातही वाढ झाली. पीडीपीचे अनेक सदस्य नंतर दहशतवाद्यांना जाऊन मिळाले अशी माहिती काश्मीरमधील गुप्तचरांनी मला दिली’, असा दावा गांधी यांनी केला.

ते म्हणाले की, ‘संकुचित राजकीय फायद्यासाठी भाजप व पीडीपी युती झाली व त्यामुळे देशाचे मात्र मोठे नुकसान झाले, त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनाच नव्हे तर इतरांनाही मोकळे रान मिळाले आहे, या धोरणात्मक चुकीची मोठी किंमत भारताला मोजावी लागली.’

‘मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मी काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न केले व नंतर दहशतवादी कारवाया खूपच कमी होऊन पर्यटन वाढले होते’, असा दावा त्यांनी केला.

First Published on September 13, 2017 3:59 am

Web Title: rahul gandhi bjp pdp alliance
 1. S
  Surendra Belkonikar
  Sep 13, 2017 at 11:28 am
  उल्हासजी,मी आपल्या मताशी मत आहे पण हा पायंडा मोदीजींनीच पाडलाय.....
  Reply
  1. A
   Ameya
   Sep 13, 2017 at 11:27 am
   हा माणूस आतापर्यंत देशात स्वतःचे हसे करून घेत होता, आता तीच परंपरा त्याने परदेशात कायम ठेवली आहे. मुळात काश्मीर प्रश्नाचे जनक याचे पणजोबा आहेत, गेल्या ७० वर्षात यांना काश्मीर प्रश्न सोडवता आला नाही. शिवाय यांचे मणिशंकर अय्यर सारखे नेते गुप्तपणे गिलानी सारख्या फुटीरतावादी नेत्यांना भेटतात, पाकिस्तानात जाऊन मोदी हटाव अशी याचना करतात, आणि हे ४७ वर्षांचे बाळ अमेरिकेत असली बालिश बडबड करते. गिलानी सारख्या फुटीरतावादी नेत्यांना इतकी वर्षं मोकळे कोणी सोडलंय? आता सरकार त्यांच्या नाड्या आवळू पाहताय तर हा जाऊन अमेरिकेत बरळतोय
   Reply
   1. N
    NITIN
    Sep 13, 2017 at 11:01 am
    पुढील ७० वर्षे ढोंगी-सेक्युलर??नेहरू-आंबयेडकर सायबांचे जुलुमी कायदे उलटे करा? मुस्लिमना १-पत्नी कायदा लावा आणि हिंदूंना २-शादी लेखी तलाकचे हक्क द्या!! पाक-मध्ये न जात इथे राहिलेल्या मुस्लिम बांधून चीन चा कुटुंब कायदा करा: १-कुटुंब-१-मूल पुढील ७० वर्षे, नंतर २ चालतील!! त्यांची चीन सारखी प्रगती होईल!! आयसिस अतिरेकी आपोआप-च कमी होतील!! मुस्लिम मुलींना शाळेत टेनिस शिकवा सानिया मिर्झा कडून!! त्यांना बीसी कोट्यात आरक्षण द्या, पुढारी बनलेल्या आंबयेडकर जातीला आता आरक्षणाची माती खाण्याची काय गरज??
    Reply
    1. R
     Ramdas Bhamare
     Sep 13, 2017 at 10:57 am
     मोदी याच पद्धतीने परदेशात भारताची बदनामी करीत होते . भारतात जन्म घेण्याची लाज वाटते असे सांगण्याइतपत त्यांची मजल गेली होती . मोदी यांना त्यांच्याच पद्धतीने सुनावणारा खमक्या शेवटी मिळालाच . ज्या सोशल मीडियावर जल्पकांच्या साहाय्याने काँग्रेसची बदनामी करून मोदी सत्तेवर आले , त्या सोशल मीडियावरील प्रचाराला बळी पडू नका असे सांगण्याची वेळ शहा यांच्यावर आली आहे . आपण वापरलेले अस्त्र आपल्यावरच उलटू लागल्याचे पाहून आता यांची चांगलीच तंतरली आहे .
     Reply
     1. S
      Somnath
      Sep 13, 2017 at 10:44 am
      बालबुद्धीचा असलेला हा शिक्कमोर्तब पुरावा.तुझ्या पक्षाची पीडीपी बरोबर होती ती कोणत्या संकुचित राजकीय फायद्यासाठी झाली होती.तंतूज्या बापजयद्यानी या देशाचे व काश्मीरचे मात्र मोठे नुकसान करून ठेवले बाळा. काहीबाही ब्रॉल्यावर हसे होणारच पण बिचाऱ्या काँग्रेस प्रवक्त्यांचे हाल होतात हा एक दोन वाक्ये बोलतो आणि त्या बिचार्यांना नाईलाजाने या बालबुद्धीचे समर्थन करावे लागते.तुमच्या सत्तेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हुरियतवाले सरकारच्या पैशावर पोसले त्यांचे लाड केले नव्हे तर देशात इतरांनाही भ्रष्टाचार करण्यास मोकळे रान मिळाले तुज्या मेव्हुण्यां ित, अश्या अनेक चुकीच्या धोरणात्मक चुकीची मोठी किंमत भारताला मोजावी लागली.’स्वतःहून काँग्रेस बुडवायचीच ठरवली असेल तर बाकीचे काय करणार.
      Reply
      1. R
       ravindrak
       Sep 13, 2017 at 9:44 am
       मीडियाची साथ आहे का करणार?? भारताची बदनामी बोलतील ते ऐकावे, वाचावे लागणार?
       Reply
       1. U
        ulhas chaudhari
        Sep 13, 2017 at 9:40 am
        राहुल गांधी नि विदेशात जाऊन आपल्या देशाच्या राजकारणाचे वाभाडे काढण्यापेक्षा देश कसा सशक्त करता यील यावर बोलणे योग्य ठरेल ,ठीक आहें ,मोदींनी जे काय केलं त्यामुळे देशाचं जेकाय नुकसान झालं त्यासाठी भारतात व्यवस्था आहे .एकतर जनतेला समजवा किंवा सनदशीर मार्ग आहेच कि जर गुप्त चरांनी हि अति महत्वाची गुप्त माहिती तुम्हाला दिली तर सुप्रीमकोर्टात जा आणि जो दोषी अशेल त्याला पदावरून पायउतार करा . देशातील अंतर्गत राजकारणाचे प्रदर्शन बाहेर जाऊन का करता , अमेरिकन अध्यक्ष करतो कधी तुमच्या देशात येऊन त्याच्या विरोधकाने काय चुका केल्या याची चर्चा . तुम्ही ज्या कामासाठी गेले तेच करा . राजीव गांधी आणि राहुल गांधी दोघांमध्ये खूप फरक आहे . राजीव गांधींनी खरंच काहीतरी केल देशाच्या हिताचं , त्यांची दुर्दैवी हत्त्या झाली . ५ वर्ष विरोधात बसू नाहीशकात करुद्यान जे करतायतं अभ्यास करा चिंतन करा लेख जोखा तयार करा पद्धतशीरपणे मुद्देसूद मांडणी करा दाखऊंद्या ६० वर्षात १२३ तोळा सोन २९००० वर कस नेऊन ठेवलं ते . परत ५ वर्षाने निवडणूक आहेच कि . विदेशात जाऊन देशाची प्रतिमा मालिन का करता .
        Reply
        1. G
         Ganeshprasad Deshpande
         Sep 13, 2017 at 7:57 am
         राहुलजींना स्वतःला हास्यास्पद बनवण्याचा कधीच कंटाळा येत नाही असे दिसते. यापूर्वी कधीही नाही इतक्या मोठ्या प्रमाणात काश्मीरात अतिरेकी घुसखोरांना मारण्याचे सत्र गेले तीन वर्षे राबवले गेले आहे असे सर्वच जण सांगताहेत. या अतिरेकी दहशतवादी घुसखोरांच्या रसद पुरवठ्याच्या नाड्या आवळण्यावरही सरकारचा भर आहे. प्रथमदर्शनी या प्रयत्नाना काही यश येतानाही दिसत आहे. इतक्या गोष्टी डोळ्यांसमोर दिसत असताना मोदींनी दहशतवाद्यांना मोकळे रान दिले असा आरोप राहुल करतील तर पुन्हा एकदा सर्वाना हसण्याची संधीच मिळेल ना? राहुलना क्षणाचे नेते आणि अनंतकाळचे विदूषक बनायचे आहे काय? पण राहुलनी हा उद्योग करायचे ठरवले तर बाटलाहाउसफेम खानदानी विदूषक दिग्गीराजा काय करणार?
         Reply
         1. A
          arun
          Sep 13, 2017 at 6:22 am
          विद्यार्थ्यांसमोर काय बोलावं याचं भान आणि वकूब असलेलं कुणीच नाही.
          Reply
          1. Load More Comments