उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाने शेतक ऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून केवळ नुकसानीचे दृश्य पाहून ३३ शेतक ऱ्यांनी प्राण गमावले असतानाच आता तेथील शेतक ऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे अनेक शेतकरी मानसोपचारासाठी आग्रा येथील मनोरुग्णालयात जात आहेत. आग्रा येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड हॉस्पिटल या संस्थेला भेट देणाऱ्यांच्या संख्येत गेल्या एक महिन्यात ३३ टक्के वाढ झाली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन रुग्णांमध्ये शेतक ऱ्यांचा जास्त समावेश असून पिकांच्या नुकसानीने त्यांना नैराश्य आले आहे. या शेतक ऱ्यांना कर्ज फेडणेही मुश्कील झाले आहे. शेतक ऱ्यांमध्ये आत्महत्येची लक्षणे दिसत आहेत व इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड हॉस्पिटल ही संस्था आता शेतक ऱ्यांवर उपचारासाठी खास केंद्र सुरू करणार आहे. काही डॉक्टर्स खेडय़ात जाऊन शेतक ऱ्यांची  तपासणी करणार आहेत व त्यांना घरी जाऊन उपचार देणार आहेत.
संस्थेचे संचालक सुधीर कुमार यांनी सांगितले, की एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण आम्ही प्रथमच पाहत आहोत. आमच्या खेडय़ांमध्ये सामाजिक व्यवस्था चांगली असतानाही शेतकरी हे धक्के पचवण्यास असमर्थ ठरत आहेत, आताच्या परिस्थितीत सर्वानी शेतक ऱ्यांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे सांगून दिलासा दिला पाहिजे. समाजाने त्यांना टाकून दिल्याची भावना निर्माण होता कामा नये. घरातील व्यक्तींनीही ताणतणावांबाबत जागरूक राहिले पाहिजे. इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड हॉस्पिटल या संस्थेत रोज ओपीडीमध्ये ३०० रुग्ण येतात, गेल्या महिन्यात ही संख्या ४०० झाली होती.