धर्म, जात यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणताही भेदभाव करीत नाही, या देशातला प्रत्येक नागरिक हा हिंदूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रसिद्धी प्रमुख मनमोहन वैद्य यांनी गुरुवारी येथे केले.
संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची तीन दिवसांची परिषद येथे शुक्रवारपासून होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते. संघात दाखल होणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या दरमहा सात हजार आहे, असे ते म्हणाले. यात अल्पसंख्याक किती आहेत, असे विचारता ते म्हणाले, आमच्या मते या देशात कुणीच अल्पसंख्याक नाही. सारेच हिंदू आहेत.