इस्त्राईलचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान शिमॉन पेरेस यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. शिमॉन पेरेस यांच्या जवळच्या व्यक्तीकडून नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती देण्यात आली. शिमॉन पेरेस यांच्या प्रकृतीबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी नसल्यामुळे याबद्दल अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच शिमॉन पेरेस यांच्या कुटुंबियांकडून याबद्दलची घोषणा करण्यात येईल. इस्त्राईलच्या स्थापनेत आणि देशाला शांततेच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी उद्युक्त करण्यात शिमॉन पेरेस यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
पेरेस यांनी दोन वेळा इस्राईलचे पंतप्रधानपद भूषविले होते. यानंतर त्यांनी २००७ ते २०१४ या काळात इस्राईलचे अध्यक्षपदही सांभाळले होते. स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ करणाऱ्या ‘ओस्लो करारा’संदर्भात बजाविलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसंदर्भात पेरेस यांना १९९४ मध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अराफत व इस्राईलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्यासह नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते. पेरेस यांना इस्राईलसहच जगात इतरत्रही अत्यंत आदराचे स्थान लाभले होते.
दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या झटक्यामुळे पेरेस यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले होते आणि कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये काही काळासाठी थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले होते.  मात्र, अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पेरेस यांच्या निधनानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी शोक व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray criticize Prime Minister Narendra Modi in amravati
“मोदी म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान, ते आता गल्‍लीबोळात फिरताहेत कारण…”, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर कठोर टीका
MP Rahul Gandhi On PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचं आव्हान; म्हणाले, “फक्त एवढंच समजून सांगा…”
Prime Minister Narendra Modi criticism of the India front as rumors about CAA by the opposition
‘सीएए’बाबत विरोधकांकडून अफवा; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र
Shashi Tharoor talk on PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? काँग्रेस नेते शशी थरूर म्हणतात…