सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लुंग हे राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात अचानक चक्कर येऊन कोसळले. या कार्यक्रमाचे दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण चालू होते. नंतर त्यांच्या सर्व शारीरिक चाचण्या करण्यात आल्या असता त्यात कुठलाही दोष आढळून आला नाही. शहरराष्ट्र असलेल्या सिंगापूरचे संस्थापक पंतप्रधान ली कुआँ यू यांचे ते पुत्र असून ते तासाभराच्या भाषणात ते अचानक बोलायचे थांबले. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांनी सावरले.

परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांनी सांगितले, की ली यांना चक्कर आली. काही कारणाने चेतासंस्थेतील एका विशिष्ट भागात बिघाड झाल्याने असे होऊ शकते. कालच्या कार्यक्रमानंतर ली आजारी असून सिंगापूरच्या ९ ऑगस्ट या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यात त्यांनी चक्कर येऊनही भाषण पूर्ण केले तेव्हा लोकांनी उभे राहून मानवंदना दिली. मी सर्वाचा आभारी आहे, यापूर्वी साफ्टीच्या संचलनावेळीही असेच घडले होते, माझ्यासाठी मी एकाच वेळी अनेक डॉक्टर्स ठेवलेले नाहीत. मी ठीक आहे पण पूर्ण तपासणी करून घेईन, नंतर त्यांना सिंगापूर सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्यांच्यावर यापूर्वी प्रोस्टेटची शस्त्रक्रिया झाली असून १९९२ मध्ये लिंफोमा या कर्करोगातून बाहेर पडले आहेत व त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी नंतर सांगितले होते.