गुगल इंडिया, याहू इंडिया व मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशन प्रा. लि. या कंपन्यांनी लिंग निदानाच्या जाहिराती काढून टाकाव्यात किंवा रोखाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भारतीय कायद्यानुसार गर्भलिंगनिदान चाचण्यांच्या जाहिराती करणे प्रतिबंधित आहे.
जर कुठल्याही सर्च इंजिनने अशा प्रकारच्या जाहिराती दिल्या असतील तर त्या मागे घ्याव्यात असा सक्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की, सर्च इंजिन्सनी धोरणात्मक पान अपलोड करावे व त्यात सेवेच्या अटी व शर्ती द्याव्यात. लिंगनिदान प्रतिबंध कायदा कलम २२ अन्वये अशा जाहिराती करणे किंवा त्या पुरस्कृत करणे हा गुन्हा आहे. न्या. दीपक मिश्रा व प्रफुल्ला सी पंत यांनी सांगितले की, गुगल, याहू व मायक्रोसॉफ्ट यांनी अशा जाहिराती करू नयेत किंवा त्या पुरस्कृतही करू नयेत.