ब्रिटनमधील मँचेस्टर एरिनात रंगलेल्या एका पॉप गायकाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या स्फोटात २० जण ठार तर सुमारे ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इंग्लंडच्या उत्तर भागात असलेल्या मँचेस्टरमध्ये झालेले हे स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आत्मघातकी हल्लेखोराने हे स्फोट घडवले असतील, असा संशय पोलिसांना आहे. अमेरिकेची २३ वर्षीय पॉप गायिका आरियाना ग्रँडचा संगीत समारोह होता. स्फोटानंतरचे व्हिडिओ समोर आले असून यात लोक जीव वाचवण्यासाठी सैरावरा धावताना दिसत आहेत. यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे व्हिडिओत दिसते. घाबरल्यामुळे लोक आरडाओरड करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेले बहुतांश हे तरूण मुलं-मुली होती.

जोपर्यंत काही पुरावे मिळत नाहीत. तोपर्यंत हा दहशतवादी हल्लाच असल्याचे मानले जाईल, असे मँचेस्टर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा स्फोट प्रवेशद्वाराजवळ झाला असल्याचे मँचेस्टर एरिनाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २००५ मध्ये लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या १२ वर्षांत ब्रिटनमध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जाते. लंडनमधील हल्ल्यात ५० जण ठार झाले होते.

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केलसहित जगातील अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.