तमीळनाडूतील  पोलीस अधिकाऱयाला डीजेच्या तालावर धरलेला ठेका चांगलाच महागात पडला आहे. पोलीस ठाण्यातील एका खोलीत ५८ वर्षीय शंकरन या महाशयांनी पोलीस गणवेशातच ‘बँजो बिट्स’च्या तालावर ठेका धरत बेधुंद होऊन नृत्य केले. खोलीत उपस्थित एकाने याचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. घडलेल्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर शंकरन यांची त्वरित बदली करण्यात आली. त्यानंतर ९ फेब्रुवारीला त्यांना निलंबीत करण्यात आले.