ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (रविवार) दिल्ली येथे आपल्या नव्या कार्यालयाचे उदघाटन केले. भ्रष्टाचाराला वेसण घालण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून देशव्यापी दौऱा करणार असल्याचे यावेळी अण्णांनी सांगितले. या दौ-याची सुरूवात बिहारमधून होणार आहे. भ्रष्टाचाराबाद्दल फक्त बोलून चालणार नाही, तर कृती करणे आवश्यक आहे. आणि आमचे तरूण कार्यकर्ते तेच काम करतील, असं अण्णा अण्णा हजारे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
दिल्लीमध्ये सर्वोदया एन्क्लेव्ह येथे अण्णांनी आज नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले. देशाला बदलायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या गावापासून सुरूवात करायला हवी, असं गांधीजी म्हणाले होते. हा दाखल देत अण्णा म्हणाले, हिच गोष्ट देशाचा विकास घडवेल. कारण जर पैशानेच लोकांना बदलता आले असते तर, टाटा, बिरला यांनी ते कधीच केले असते, असंही ते पुढे म्हणाले.  
जनलोकपाल विधेयकाच्या मागणीवरून देशव्यापी आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (शनिवार) टीम अण्णाची दुसरी आवृत्ती काढली. राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी बाहेर पडल्यावर अण्णा हजारे यांनी १५ सहकाऱ्यांची नवी टीम तयार केली आहे. या नवीन टीममध्ये किरण बेदी न्या. संतोष हेगडे, मेधा पाटकर, अखिल गोगोई, अविनाश धर्माधिकारी, विश्वंभर चौधरी, अरविंद गौर, लेफ्ट. कर्नल बिजेंद्र खोकर, राकेश रफिक, सामाजिक कार्य़कर्ते अक्षय कुमार, शिवेंद्र सिंग आणि सुनिता गोदरा यांचा समावेश आहे.
भ्रष्टाचार मिटविण्यासाठी व्यवस्था बदलली गरजेचे आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी अण्णा ३० नोव्हेंबरपासून देशव्यापी दौ-याला सुरूवात करणार आहेत. भ्रष्टाचारमुक्त देश आणि संपूर्ण परिवर्तण हा या दौ-याचा मुख्य उद्देश आहे, असं अण्णा म्हणाले.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आणा, अन्यथा सरकार सोडा, अशी मागणी अण्णानी आज केली. तसेच विदेशी गुंतणूक देशासाठी घातक असल्याचंही अण्णा पुढे म्हणाले. नव्या टीममध्ये अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं अण्णांनी सांगितलं.