29 May 2016

अजय पेवेकर ‘नवोदित मुंबई श्री’

मुंबई बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनतर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत गुरुदत्त जिमच्या अजय पेवेकरने अश्विन

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई | February 3, 2013 2:19 AM

मुंबई बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनतर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत गुरुदत्त जिमच्या अजय पेवेकरने अश्विन पवार (बॉडी गराझ) व मयूर घरत (गुरुदत्त जिम) यांच्यावर मात करत ‘नवोदित मुंबई श्री’चा किताब पटकावला. उत्कृष्ट पोझरचा मान पालकर जिमच्या सचिन बनेने पटकावला. निसार दाऊदानी हा ‘मुंबई अपंग श्री’ किताबाचा मानकरी ठरला.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : ५५ किलो : १) कल्पेश भोईर, २) सय्यद अली, ३) प्रशांत तांबीटकर, ४) सुशील गंगावणे, ५) हितेंद्र घरत. ६० किलो : १) सुनील गायकरे, २) कैलाश तेलंगे , ३) महेंद्र पावसकर, ४) शैलेश किलंजे, ५) वैभव काळंबे. ६५ किलो : १) अश्विन पवार, २) सचिन वर्दे, ३) सचिन बने, ४) कमलेश शिंदे, ५) रोहित अडसूळ. ७० किलो : १) मयूर घरत, २) कल्पेश पाटील, ३) मंगेश कदम, ४) सागर भोसले, ५) वाहीद बांबूवाला. ७५ किलो : १) श्रीकांत भाडे, २) रणधीर सिंग, ३) दीपक जोशी, ४) शैलेश आचार्य, ५) हेमंत पालकर. ७५ किलोवरील : १) अजय पेवेकर, २) प्रशांत पवार, ३) सागर जाधव, ४) विनायक वनदुरे, ५) संजीत सायनी.

First Published on February 3, 2013 2:19 am

Web Title: ajay pevekar raising mumbai shree
टॅग Body-building,Sports